माझ्या शाळेतील स्नेहसंमेलन (SSC २०१७)

मुद्दे – रांगोळी/ चित्रकला प्रदर्शन, पारितोषिक वितरण, प्रमुख पाहुणे व त्यांचे भाषण सांस्कृतिक कार्यक्रम

            माझा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेल्लन दिनांक २४ फेब्रुवारी रोजी होते. शाळेतील मुलांच्या चित्रांचे व रांगोळीचे प्रदर्शन दोन दिवस आधीपासून म्हणजे २२ फेब्रुवारी पासून चालू होते.

संध्याकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे क्रिकेट खेळाडू ‘प्रवीण आंब्रे” होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर पाहुण्यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात शाळेत होणाऱ्या अभ्यासासहित अनेक गोष्टी कशाप्रकारे एका विद्यार्थ्याच्या वैयक्तिक विकासाला व शाळेच्या प्रगतीला कारणीभूत ठरतात ते सांगितले. त्यानंतर मुख्यध्यापकांचे भाषण झाले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वात आधी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. ६ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर अनेक भावगीते, देशभक्तीपर गीते त्यांनी सादर केली. ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक कोळी नृत्य सादर केलं. चिमुकल्यांनी धनगर नृत्य केलं. ५ वीच्या विद्यार्थ्यांचे विनोदी नाटक खूपच बहारदार झालं. त्यानंतर ९ वीच्या विद्यार्थ्यांनी मिळून वादनाचा कार्यक्रम सादर केला. तोही मंत्रमुग्ध करणारा होता. त्यात तबला, ड्रम्स, सतार, कीबोर्ड, गितार यासारखी वाद्ये वाजवून एक अनोखा अनुभव त्यांनी प्रेक्षकांना दिला.