प्रसंगलेखन (SSC Revised २०२३)
१५ डिसेंबरला अश्वमेध सभागृहात भरलेले कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन मी पाहायला गेलो. सहजच काहीतरी वेगळे प्रदर्शन आहे असे मला वाटले म्हणून मी गेलो. या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ उद्योजिका डॉ. अदिती जोशी यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन तर नेहेमीच भरतात, पण हे प्रदर्शन खरंच वेगळे होते, कारण या प्रदर्शनातील वस्तू ह्या दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या होत्या. प्रदर्शनात फिरताना जाणवत होते. त्यातली प्रत्येक वस्तू उत्तमरित्या एक कलाकार जसा घडवतो तशी होती. हे प्रदर्शन होतं एका दिव्यांग शाळेने भरवलेले. त्या शाळेतल्या ३५ विद्यार्थ्यांनी एक एक वस्तू हाताने बनवलेली होती. अनेक प्रकारचे कागदी लॅम्प तिथे होते. ते कागदी लॅम्प हाताने रंगवलेले होते व त्याचे सर्व योजना सुद्धा या विद्यार्थ्यांनीच केलेली होती. रक्षाबंधन जवळ असल्याने स्टॉल वर बुकमार्क्स, राख्या होत्या. ह्या राख्या कागद व धागे यांच्या साहाय्याने बनवलेल्या होत्या. लहान मुलांची वेगवेगळी कार्टून्स, आकर्षक डिजाईन या राख्यांमध्ये होते.
तिथेच एक मराठी सुलेखन असलेले टी-शर्ट्स चे स्टॉल येथे होते. या टी शर्ट्स वर अनेक प्रिंट्स जसे “आई मला खेळायला जायचंय”, ‘लबाड”, “कसा काय?”, “माझा बाप्पा किती गोड दिसतो” असे अनेक मजेदार वाक्य त्यावर लिहिली होती. आपल्याला हवे ते वाक्य सुद्धा ते छापून देत होते. लहान मुलांची लाकडी खेळणी तिथे मुलांनी बनवली होती. त्यामध्ये अनेक प्रकारची खेळणी होती. गणपतीचे मखरही मुलांनी बनवले होते. ज्यात वेगवेगळया डिझाइन्स, दृश्ये व कलाकृती होत्या. तिथे खूप गर्दी होती व खूप लोक तिथे सुबक मखर खरेदी करत होते. शाडूच्या मातीने बनवलेल्या वेगवेगळ्या गणेश मूर्ती सुद्धा तिथे होत्या. मेक्रमच्या दोऱ्यांचे अनेक प्रकार जसे भिंतीवर सजावटीच्या वस्तू, लटकणारे फलके, झाडाच्या कुंड्या टांगण्यासाठी अनेक डिसाईन्स किंवा टोपल्या, आकर्षक रंगात व विविध आकारात त्या मुलांनी बनवल्या होत्या. त्यातली एक भिंतीला टांगणारी सजावटीची वस्तू मी विकत घेतली. आयोजकांकडे सर्वजण आपला अभिप्राय कळवत होते. वस्तू खूपच उत्कृष्ट दर्जाच्या असूनही वाजवी दराच्या होत्या. खरंच ही मुले खूपच गुणवंत आहेत.