Letter Writing
पत्रलेखन हे आपले म्हणणे मांडण्याचं, आपला निरोप पाठवण्याचं एक लिखित साधन आहे. आपले विचार एका कागदावर लिहून पाठवण्याचे पत्र एक माध्यम आहे. आपले म्हणणे, आपला निरोप योग्य व नेमक्या शब्दात मांडता येणे हे कौशल्याचे काम आहे. पत्राद्वारे आपण प्राचार्य, अधिकारी यांना विनंतीचा अर्ज, आवेदन पाठवू शकतो. पत्राद्वारे आपण दूर असणाऱ्या मित्रांना नातेवाईकांना आपला संदेश पाठवू शकतो.
पत्राचे दोन मुख्य प्रकार असतात
१. औपचारिक पत्र
२. अनौपचारिक पत्र
१. औपचारिक पत्र : जे पत्र एखाद्या अधिकारी, प्राचार्य, किंवा इतर कुणासही एखादी विनंती किंवा सूचना करण्याकरता लिहिले जाते त्याला औपचारिक पत्र म्हणतात.
२. अनौपचारिक पत्र : जे पत्र नातेवाईकांना, आई – वडील, भाऊ-बहीण, मित्र यांना लिहिले जाते त्याला अनौपचारिक पत्र म्हणतात.
औपचारिक पत्र लिहिण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
१. पात्राच्या उजवीकडे ज्याला पत्रा लिहीत आहोत त्याला संबोधित करणे “आदरणीय/माननीय” व त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव व पद लिहावे.
२. त्यानंतर पत्राचा मुख्य विषय लिहिला जातो. आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडले जाते.
३. पत्राच्या शेवटी आपले नाव, पत्ता आणि दिनांक लिहिले जाते.