प्र. १. खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांच्या तुलना करा.
अब्दुल = निस्वार्थी, संवेदनशील
रघूभैया = हिशोबी, व्यवहारी, असंवेदनशील
प्र २. खालील विधानांमागील कारणे लिहा.
अ) रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून.
उत्तर: अब्दुलने तपोवनात जातो असे जरलोकांना सांगितले तर धंद्यावर त्याचा परिणाम होतो असे शन्नूला वाटे.
आ) आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.
उत्तर: दर संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला अब्दुल तपोवनात स्त्रियांना बांगड्या चढवायला जात असे. दुसऱ्यांसाठी जगण्यात अब्दुलला आनंद वाटत असे. तिथल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा बांगड्या घातल्यानंतरचा आनंद त्याच्यासाठी अमूल्य होता. म्हणून आजचा दिवस त्यांच्यासाठी पर्वणीच असे शन्नू म्हणत होती.
प्र ३. गुणविशेष लिहा.
अ) दाजीसाहेब – दानशूर, समाजसेवक, संवेदनशील
आ) शन्नोची स्वभाववैशिष्ट्ये – रागीट, असमाधानी
प्र ४. खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.
- अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.
अव्यय – जवळ
प्रकार – शब्दयोगी अव्यय
- तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.
अव्यय – आणि
प्रकार – उभयान्वयी अव्यय
- बापरे! केवढी मोठी वसाहत.
अव्यय – बापरे!
प्रकार – केवलप्रयोगी अव्यय
- राघूभैय्याने चिठ्ठी भरभर वाचली.
अव्यय – भरभर
प्रकार – क्रियाविशेषण अव्यय
प्र ५. विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
- “अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.”
उत्तर: दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम व पूर्णविराम
- “अन्वर जेवला?”
उत्तर: दुहेरी अवतरण चिन्ह व प्रश्नचिन्ह
प्र ७. स्वमत.
अ) सत्यता पटवून द्या – ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’
उत्तर: अब्दुल एक बांगडीवाला आहे. तो संक्रांत व ज्येष्ठ पौर्णिमा यादिवशी तपोवनात (कुष्ठरोग्यांसाठी बनवलेली वसाहत) स्त्रियांना बांगड्या घालण्यासाठी जात असे. संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा हे दोन दिवस म्हणजे एका बांगडीवाल्याच्या दृष्टीने महत्वाचे, त्या दिवशी त्याचा धंदा चढा असे. पण आपले दुकान सोडून त्या दिवशी अब्दुल तपोवनातल्या भगिनींसाठी वेळ काढून त्यांना बांगड्या घालण्याकरता जात असे. स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता तिथे असणाऱ्या स्त्रियांना बांगड्या घालून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणे त्याला जास्त प्रिय होते. कुठलाही मोबदला अब्दुलला अपेक्षित नव्हता. तर दरवर्षी न बोलावता तो तपोवनात जात असे. त्याने बांगड्या घातल्यावर तिथल्या स्त्रिया व मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी. त्यातच त्याचा आनंद होता. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने थोर समाजसेवक आहे.
आ) शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर: शन्नूला अब्दुलचे तपोवनात जाणे आवडत नसे, कारण ती एक कुष्ठरोग्यांची वसाहत होती. तिला वाटत असे की तिच्या नवऱ्याने शेजारच्या रघूभैयासारखे पैसे कमावून घरात नवनवीन वस्तू आणाव्यात. आपल्या मुलाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. पण ऐन धंद्याच्या दिवशीच अब्दुल कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत म्हणजेच तपोवनात जात असे. म्हणजे ऐन धंद्याच्या दिवशी दुकानात नसे. त्यामुळे त्याचे दुकानाकडे, मुलांकडे घराकडे दुर्लक्ष होत आहे, असे शन्नूला वाटे. त्यामुळे अब्दुल तपोवनात निघाला की त्याच्यावर चिडत असे. तसेच त्याला ती त्याच्या तपोवनात जाण्याबद्दल कोणालाही सांगू नये असे बजावत असे.
इ) तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर: तंत्रज्ञानाची मदत घेऊन अब्दुलचा मुलगा गावागावात आपल्या बांगड्यांची जाहिरात करू शकतो. लग्नकार्य व इतर शुभ कार्य असलेल्या घरांना किंवा कुटुंबांना संपर्क करून तिथे आपला व्यवसाय करू शकतो. तसेच ऑनलाइन स्वत:चे संकेतस्थळ बनवून बांगड्या विकू शकतो किंवा इतर संकेतस्थळांवर सुद्धा तो बांगड्या विकू शकतो.
ई) दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.
उत्तर: एखाद्या वयस्कर आजी-आजोबांना किंवा अंध व्यक्तींना रस्ता ओलांडण्याकरता अनेकदा त्रास होतो. त्यांची तारांबळ उडते. तेव्हा त्यांना रस्ता ओलांडण्याकरता मदत करून जो आनंद मिळतो तो निखळ असतो.