प्रश्नपत्रिकांचा = संच 

 पालेभाजीची = जुडी 

 पोत्यांची = थप्पी

 नोटांची = थप्पी

 करवंदाची = जाळी

 फुलझाडांचा – ताटवा 

 खेळाडूंचा = संघ

 भाकऱ्यांची = चवड 

 यात्रेकरूंचा = जथ्था

 जहाजांचा = काफिला 

 वाद्यांचा = मेळ

 द्राक्षांचा = घड / झुबका 

 कडबा = पेंढी 

 लाकडाची = मोळी 

 मेथीची = जुडी 

 पुस्तकांचा = गठ्ठा

 वाहनांचा = ताफा

 माणसांचा = जमाव 

 केळ्यांचा = घड

 हरणांचा = कळप 

 मेंढ्यांचा = कळप 

 वेलींचा = कुंजर 

 माकडांची = टोळी

 पक्ष्यांचा = थवा 

 उपकरणांचा = संच

 प्रवाशांची = झुंबड

 फळांचा = ढीग 

 गुरांचा = कळप

 महिलांचे = मंडळ

 चोरांची / दरोडेखोरांची = टोळी 

 वस्तूंचा = संच 

 धान्याची = रास 

 वारकऱ्यांची = दिंडी

 विमानांचा = ताफा

 गाड्यांचा = ताफा

 मुलांचा = घोळका

 दुर्वांची = जुडी 

 केसांची = बट

 केसांचा = पुंजका / झुबका 

सैनिकांचे = पथक / पलटण 

हत्तींचा = कळप

 मुंग्यांची = रांग 

 ताऱ्यांचा = समूह 

 तारकांचा = पुंज 

 नारळांचा = ठीक 

 गवताची = पेंढी 

 उसाची = मोळी 

 माशांची = गाथण 

फुलांचा = गुच्छ 

 काजूची = गाथण