श्री

मेधा साटम

  ए-विंग, ४०५ 

गोल्डन नेस्ट,जी बी रोड,

डोंबिवली (पू)

आदरणीय,

गोखले सर यांना साष्टांग नमस्कार

महाराष्ट्र सरकारने “आदर्श शिक्षक” म्हणून राज्य पुरस्कार दिल्याची बातमी आत्ताच समजली. बातमी ऐकून खूप आनंद झाला.

तुम्ही माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी अनेक कष्ट केले आहेत. तुमच्या त्या कष्टाचे फळ तुमच्या पदरात पडले आहे. तुमच्या कष्टांचे चीज झाले. हि बातमी ऐकून तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आनंद होईल.

जो एखादा विषय शिकवतो तो शिक्षक. पण तुम्ही प्रत्येक मुलाला एखादा विषय तेवढ्याच सहजतेने समजावून सांगता कंटाळा न करता. अगदी हुशार आणि कच्चा मुलांनाही. त्यामुळे आपल्या शाळेचा निकाल नेहेमी चांगलाच लागतो.

तुमचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात उच्च पदांवर काम करीत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे तुमचे ध्येय साध्य झाले. तुमची अशीच वाटचाल चालू राहो आणि तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचे पुरस्कार मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तुमची नम्र विद्यार्थिनीमेधा साटम