२४ जुलै २०१७

प्रिया सुनील दादा,

तू कसा आहेस?? तुझ्या  परीक्षा संपल्या असतील ना ? तुझे सगळे पेपर चांगले गेले असतील, अशी आशा करतो. तुझ्या  कॉलेजचे रेग्युलर लेक्चर चालू असतील ना आता? दादा तुला आज पत्र लिहिण्याचे एक विशेष कारण आहे, ते म्हणजे शाळेच्या वार्षिक संमेलनात मी नाटकात भाग घेतला होता. आणि मला शिक्षकांनी नाटकातली प्रमुख भूमिका दिली होती. एका खेळाडूची गोष्ट होती आमच्या नाटकात आणि प्रमुख भूमिका माझी फक्कड झाली म्हणून मला विशेष बक्षिस मुख्याध्यपकांकडून मिळाले.

फोटो पण काढले आहेत तू आलास की तुला दाखवेन. बक्षीस म्हणून मला कूपन्स मिळालीत आवडीची पुस्तके घेण्यासाठी. तू सुट्टीमध्ये आल्यावर  तुला फोटो आणि बक्षीस दोन्ही दाखवेन. तुझ्या  पत्राची वाट बघत आहे.

तुझा

सुजीत

प्रति,सुनील शंकर वैद्य१०२ गव्हर्नमेंट हॉस्टेल,बारामती,पुणे ४१३१०२
प्रेषकसुजीत शंकर वैद्य१६१, गीतांजली,खाडिलकर रस्ता,विक्रोळी (प) – ४०००७९