दिनांक २० जुने २०१९

प्रति,

मुख्याध्यापक

नूतन मराठी विद्यालय

कुर्ला मुंबई – ४०००७०

विषय : आजारपणामुळे शाळेत हजर न राहता येण्याबद्दल

आदरणीय मुख्याध्यापक,

मी इयत्ता ५ क मध्ये शिकणारा विदयार्थी अखिलेश कुमार बापट. मी मलेरिया ने आजारी असल्यामुळे २ दिवस रुग्णालयात होतो. आत्ता मला माझा डॉक्टरांनी अजून ४-५ दिवस आराम करण्यास सांगितले आहे.  त्यामुळे मला शाळेत प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही. पण मी माझा मित्रांकडून झालेले धडे घेऊन अभ्यास पूर्ण करेन.

कृपया माझी सुट्टी मंजूर करावी.

कळावे,

आपला आज्ञाधारक

अखिलेश

अखिलेश कुमार बापट

२/३, वसंत निवास

कुर्ला (पू)