श्री
जीवन सुर्वे
विध्यार्थी प्रमुख
न्यू इंग्लिश स्कूल,
बोरिवली (प.)
दिनांक १२/१२/ २०२०
माननीय
आहार तज्ज्ञ
सुमन रणदिवे,
कैलास-२,
मुंबई.
विषय : शालेय मुलांना आहाराचे महत्व या विषयावर व्याख्यान देण्याबद्दल
माननीय महोदया,
२६ जानेवारी २०२१ रोजी आमच्या शाळेत न्यू इंग्लिश स्कूल, बोरिवली (प.) येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहून आपल्या जीवनात आहाराचे महत्व या विषयी आपले विचार मांडावे अशी आमची इच्छा आहे. विध्यार्थी प्रमुख या नात्याने मी आपणास हे पत्र लिहीत आहे.
आजच्या अटीतटीच्या काळात आपल्या जीवनात आहाराचे महत्व किती आहे हे सांगण्याकरिता आपल्याशिवाय योग्य व्यक्ती दुसरी कुणी नाही. तुमचे आहार शास्त्र या विषयावरचे सखोल ज्ञान सर्वज्ञात आहे.
कार्यक्रम सकाळी ७ ते १० आहे. ७.३० वाजेपर्यंत ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पुढील सांस्कृतिक कार्यक्रम व इतर काही व्याख्याने आहेत. आपल्या किती वाजता सवड होईल हे कळवल्यास त्या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेखा आखता येईल. कृपया पत्रोत्तर द्यावे.
आपला कृपाभिलाषी,
जीवन सुर्वे
विध्यार्थी प्रमुख