दिनांक : २२ जुने २०१४

प्रति,

माननीय व्यवस्थापक,

अनमोल प्रकाशन,

शिवप्रकाश,

डोंबिवली ४२१३०१

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी

महोदय,

आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी काही पुस्तकांची आवश्यकता आहे. त्यांची यादी खाली देत आहे. पुस्तकांसोबत त्यांचे बिल पाठवावे. पुस्तके  व बिल दोन्ही मिळाल्यावर आपली बिलाची रक्कम पाठवण्यात येईल. 

पुस्तकांवर योग्य ती सवलत द्यावी.

पुस्तकाचे नाव प्रती

१. एक होता कार्व्हर २

२. श्यामची आई २

३. आकाशाशी जडले नाते २

४. राधेय २

वरील पुस्तके लवकरात लवकर पोहोचवण्याची विनंती आपणास करत आहोत.

आपला विश्वासू,

संग्राम चिटणीस

विद्यार्थी प्रतिनिधी

महाराष्ट्र विद्यालय

चिंतामणी मार्ग,

ठाणे ४००६१०