आपले विचार व भावना इतरांना कळावे म्हणून आपण भाषेच्या माध्यमातून सांगत असतो किंवा लिहित असतो. पण आपले विचार जर इतरांना कळलेच नाही किंवा भाषेचा उपयोग करताना जर आपल्या चुका झाल्या तर ते सगळ्यांनाच खटकते. त्यासाठी भाषेचा उपयोग बिनचूक होणे आवश्यक आहे भाषा ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.  आपल्या जीवनातील सारे व्यवहार भाषेवर अवलंबून आहेत.

                भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत या नियमानाच व्याकरण असे म्हणतात. 

          व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण. आपल्याला जर एखादी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जे विचार व्यक्त करायचे आहेत ते व्यक्त करण्यासाठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व्याकरणाचा उपयोग फक्त लेखनासाठी नाही तर अचूक भाषा बोलण्यासाठी म्हणजेच आपले विचार कौशल्याने मांडण्यासाठी ही करावा. भाषा आणि व्याकरण हे  परस्परांशी एकरूप आहेत. भाषेची घडण ही वाक्यांनी बनलेली आहे तर वाक्य शब्दांनी बनलेले आहे आणि शब्द वर्णांनी बनलेले आहेत. 

 भाषेमध्ये वाक्प्रचार व म्हणी यांचा सर्रास समावेश केला जातो. गद्य प्रमाणे पद्य हे भाषेचे महत्त्वपूर्ण अंग आहे.

Image indicating punctuations, concepts & terms in Grammar