अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अर्थ – संकटकाळी जो कामी येईल त्याला देव मानावे लागते.
आयत्या बिळावर नागोबा.
अर्थ – दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचा स्वतः साठी फायदा करून घेणे.
अति तेथे माती.
अर्थ – एखादी गोष्ट अति केल्याने त्याचे दुष्परिणाम अटळ असतात.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
अर्थ – जो स्वतःला जास्त शहाणा समजतो (दुसऱ्यांचे ऐकून घेत नाही) त्याला नुकसान सहन करावे लागते.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.
अर्थ – अपेक्षेपेक्षा जास्त बमळणे.
आंधळे दळते कुत्रे पीठ खाते.
अर्थ – कष्ट करणारा एक व्यक्ती असतो परंतु फायदा घेणारा दुसराच.
इच्छा तेथे मागथ.
अर्थ – कोणतेही काम करण्याची इच्छा असेल तर रस्ता सापडतोच.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
अर्थ – उतावळेपणाने केलेले काम चुकीचेच होते.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
अर्थ – काहीही बवचार न करता बोलणे .
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
अर्थ – सर्वांचे ऐकून शेवटी आपल्याला योग्य वाटेल तेच करणे.
अंथरूण पाहून पाय पसरावे.
अर्थ – आपली कुवत पाहून कोणतीही गोष्ट करावी.
करावे तसे भरावे
अर्थ – जसे कृत्य करू तसेच परिणाम भोगावे लागतात.
काखेत कळसा गावाला वळसा.
अर्थ – एखादी वस्तू आपल्याच जवळच असताना आपण त्याचा विसर पडून ती लांबवर शोधत राहतो.
कामापुरता मामा ताकापुरती आजी.
अर्थ – कामापुरतेच संबंध ठेवणे, काम झाल्यावर विसरून जाणे.
कोल्ह्याला द्राक्ष आंबट.
अर्थ – एखादी गोष्ट बमळत नसेल तर त्या गोष्टीला नावे ठेवणे.
खाण तशी माती.
अर्थ – जसे आपण विचार करू तसेच घडते. जशी खाण असेल तशीच माती असते.
गर्वाचे घर खाली.
अर्थ – गवथ केल्याने कोणतीही गोष्ट साध्य होत नाही उलट नुकसानच होते.
गाढवाला गुळाची चव काय?
अर्थ – मूर्खाला चांगल्या गोष्टीचे गुण कळत नाही.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
अर्थ – प्रत्येकाला काही दिवस अधिकार मिळतात.
चोराच्या उलट्या बोंबा.
अर्थ – एखादी गोष्ट मी केली हे मान्य न करता उलट दुसऱ्यालाच दोष देणे.
चोराच्या मनात चांदणे.
अर्थ – वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल याची सतत भीती वाटते.
डोंगर पोखरून उंदीर काढणे.
अर्थ – खूप परिश्रम करून थोडेसे यश मिळणे.
पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये.
अर्थ – ज्या लोकांबरोबर नेहमी संबंध येतो, त्या लोकांबरोबर वैर करू नये.
नाव मोठे लक्षण खोटे.
अर्थ – खूप नाव कमावलेली व्यक्ती नेहमी चांगली असेलच असे नाही.
नाचता येईना अंगण वाकडे.
अर्थ – काम करता नाही आले तर उगाच सबबी सांगणे.
देव तारी त्याला कोण मारी.
अर्थ – ज्याचे रक्षण देव करतो त्याला कोणीही मारू शकत नाही.
थेंबे थेंबे तळे साचे.
अर्थ – थोडे थोडे जमवीत राहिल्याने कालांतराने मोठा संचय होतो.
वासरात लंगडी गाय शहाणी.
अर्थ – अडाणी माणसांमध्ये थोडेसे ज्ञान असणारा माणूसही शहाणा असतो.