प्र १. अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा.
अ ) तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बस मध्ये उभी आहे.
उत्तर : मी स्वतः उभी राहून त्या वृद्ध व्यक्तीला बसायला जागा देईल.
आ ) लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बस मध्ये उभ्या आहेत.
उत्तर : मी स्वत: उभी राहून त्या काकूंना बसायला जागा देईल.
इ) तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे .
उत्तर : मी नम्रपणे त्यांना कुणाशी बोलायचे आहे ते विचारेल .
ई) एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे .
उत्तर : मी त्यांना त्या पत्त्यावर पोहचण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करेल .
उ) तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
उत्तर : शाळेत जाताना व येताना मी त्याच्याबरोबर जाईल व वेळोवेळी त्याला हवी ती मदत करेल .
प्रश्न २. खालील वाक्यातील नाम ओळखा त्याखाली रेघ ओढा .
अ ) हॅलो काका, मी संजू बोलतोय.
उत्तर : हॅलो काका, मी संजू बोलतोय.
आ ) आजी, तुम्ही या जागेवर बसा.
उत्तर: आजी, तुम्ही या जागेवर बसा.
इ) दिनेश हा गुणी मुलगा आहे.
उत्तर : दिनेश हा गुणी मुलगा आहे.
प्रश्न ३ . खालील वाक्यात योग्य नामे लिहा.
- हा माझा जिवलग मित्र आहे.
उत्तर : रमेश हा माझा जिवलग मित्र आहे .
आ ) माझ्या दप्तरात ………. , ………., , ………… या वस्तू आहेत.
उत्तर : माझ्या दप्तरात वह्या , पुस्तके आणि पेन्सिल या वस्तू आहेत .
प्रश्न ४. खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा.
उदा : ओल -ओलावा
उत्तर :
- मायाळू
- गोडवा
- लहानपण
- कष्टाळू
- चपळता
- मोठेपण