प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) मारियाच्या घराला कुलूप का होते?

उत्तर :  मारियाचे आई बाबा लग्नाला गेले होते म्हणून तिच्या घराला कुलूप होते.

आ ) मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या ?

उत्तर : बाहेर जोरात वारा वाहू लागला, ढगाचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरु झाला आणि दारे एकमेकांवर धाडधाड आपटू लागली म्हणून मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या.

इ ) पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?

उत्तर : पाऊस थांबल्या नंतर पानांआड लपलेले पक्षी बाहेर आले.

ई )  मारिया आईला का बिलगली?

उत्तर : आईची वाट बघून मारियाला कंटाळा आला होता म्हणून आईला बघताच मारिया आईला बिलगली.

प्रश्न २. जोडया जुळवा 

         ‘अ गट’            ‘ब गट’ 

       ढगाचा            खळखळाट 

      विजांचा            फडफडाट 

      पाण्याचा           गडगडाट 

      पंखाचा            कडकडाट 

उत्तर :  

            ‘अ गट ‘           ‘ब गट’ 

            ढगांचा          गडगडाट 

            विजांचा        कडकडाट 

            पाण्याचा       खळखळाट 

            पंखांचा         फडफडाट 

प्रश्न ३.  वाचा. सांगा. लिहा 

अ ) शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द ,  उदाहरणार्थ – धाडधाड 

 उत्तर : फडफड , धो –धो , हळूहळू , टपटप . 

आ ) नादमय शब्द .  उदाहरणार्थ – कडकडाट , गडगडाट यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा.

 उत्तर :  थयथयाट, घमघमाट 

 प्रश्न ४.  खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा 

      घड्याळ

      खिडक्या 

     हळूहळू 

      गुणगुणू 

      खळखळाट 

 प्रश्न ५ . रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा.  

अ ) पाऊस सुरु झाला . 

उत्तर : पाऊस बंद झाला .

आ ) मारिया सावकाश दाराकडे गेली. 

उत्तर : मारिया धावत दाराकडे गेली 

 प्रश्न ६. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.  

  अ ) चढणे  x  उतरणे 

  आ ) आठवणे  x विसरणे

  इ ) उंच   x  ठेणगा 

  ई )  बाहेर  x  आत 

  उ ) थांबणे  x  जाणे 

प्रश्न ७ . पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा .

उत्तर :   निबंधलेखन विभागात पहावे . 

प्रश्न ८ . पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल ? 

उत्तर :  पावसाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे . 

  १ . पावसात विनाकारण भिजू नये .

  २ . पावसात भिजल्यास जास्त वेळ कपडे ओली ठेवू नये. 

  ३ . पावसाळ्यात आहाराचे सुद्धा योग्य नियोजन करावे .

  ४ . पिण्याचे पाणी नेहमी उकळून घ्यावे . 

  ५ . बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे .

  ६ . घरात  कुठेही पाणी साचू देऊ नये .

प्रश्न ९ . खालील शब्दसमूह वाचा.  त्यातील क्रियापद ओळखा .  त्याखाली रेघ ओढा . 

 अ ) पक्षी बाहेर आले.  

 उत्तर : पक्षी बाहेर आले . 

आ )  मरियाने आकाशाकडे पाहिले .  

उत्तर : मारियाने आकाशाकडे पाहिले.  

 इ ) दारावरची बेल वाजली . 

 उत्तर  : दारावरची बेल वाजली. 

ई ) मारिया पळत दाराकडे गेली .  

 उत्तर :  मारिया पळत दाराकडे गेली .  

 प्रश्न ११.  क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा . 

 अ )  मारिया घरी …………..

 उत्तर : मारिया घरी आली . 

 आ ) मारिया कविता ………….

 उत्तर : मारिया कविता गुणगुणू लागली .  

इ ) मारियाने दार ……….

 उत्तर : मारियाने  दार उघडले . 

ई )  मी चेंडू ………….

उत्तर : मी चेंडू फेकला .

उ ) ताई पुस्तक ………..

उत्तर : ताई पुस्तक वाचते.