प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ ) नदीचा जन्म कोठे होतो?

 उत्तर : नदीचा जन्म पर्वतावर होतो . 

आ ) नदी मोठी कशी होते?

 उत्तर : नदीला अनेक पुढे येऊन भेटतात म्हणून नदी मोठी होते.

इ ) नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात?

 उत्तर :  नदीच्या पाण्याचा उपयोग वीज बनवण्यासाठी, शेतातील पंप चालवण्यासाठी, व पिण्यासाठी करतात.

ई ) नदीचा वेग कधी कमी होतो?

 उत्तर : पर्वतावरून सपाटी मैदानी भागात आल्यावर नदीचा वेग कमी होतो.

उ ) नदी आपल्याला कोणता संदेश देते ?

 उत्तर :  “थांबला तो संपला” असा संदेश नदी आपल्याला देते.

 प्रश्न २.  पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा त्यानुसार रिकाम्या जागा भरा .

अ) चालणे – चालतात , चालवतात 

आ) पळणे – पळतात , पळवतात

इ) भेटणे – भेटतात , भेटतात 

ई)  करणे -करतात , करवतात 

उ)  मिळणे – मिळतात , मिळवतात 

ऊ)  थांबणे –  थांबतात , थांबवतात 

 प्रश्न ३.  हिरवेगार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. 

 उत्तर  : काळेभोर, लालेलाल, निळसर , पिवळेधमक ,इत्यादी.