प्रश्न १. कोण ते लिहा.
अ ) पाचवीत शिकणारी
उत्तर : शिवानी
आ ) कपड्यांच्या घड्या करणारा
उत्तर : भाऊ
इ ) आईजवळ पैसे देणारे
उत्तर : बाबा
ई ) पैसे परत करणारे
उत्तर : दामू काका
उ ) पैसे मोजून घेणारी
उत्तर : आई
ऊ दामू काकांना बक्षीस देऊ करणारे
उत्तर : बाबा
प्रश्न २. कोण कोणास म्हणाले ते लिहा .
अ ) त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे
उत्तर : हे वाक्य आई शिवानीला म्हणाली.
आ ) काय रे बाबा कपडे आणलेस का ?
उत्तर : हे वाक्य आई दामू काकांना म्हंटली.
इ ) तुझा प्रामाणिकपणा मला आवडला .
उत्तर : हे वाक्य बाबा दामू काकांना म्हंटले .
ई ) आम्ही गरीब आहोत पण कष्टानेच कमवून खातो.
उत्तर : हे वाक्य दामू काका बाबांना म्हंटले.
प्रश्न ३. प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा .
उत्तर : वक्तशीरपणा , साधेपणा , मोकळेपणा , समजूतदारपणा , सज्जनपणा , इत्यादी.
प्रश्न ४. गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा .
उत्तर :
इस्त्री इस्त्री वाले
रिक्षा रिक्षावाले
भाजी भाजीवाले
फळ फळवाले
झाडू झाडूवाले
प्रश्न ५ . खालील शब्द वाचा व असेच लिहा.
स्वयंपाकघर , इस्त्रीवाला , कावरीबावरी , प्रामाणिक , संध्याकाळ .
प्रश्न ६ . वाक्य वाचा . क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात ✔अशी खूण करा .
उत्तर :
प्रश्न ७ . खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा .
अ ) कावळा झाडावर राहतो .
उत्तर : कावळा – पुल्लिंग
आ ) रेश्मा ने पत्र वाचले .
उत्तर : रेश्माने – स्त्रीलिंग.
इ ) पोस्टमन ने पत्र दिले .
उत्तर : पोस्टमनने – पुल्लिंग .
ई ) मायाने पाकिट उघडले .
उत्तर : पाकीट – नपुसकलिंग.
उ ) मायाने दार उघडले.
उत्तर : दार – नपुसकलिंग .
प्रश्न ८. रिकाम्या जागी योग्य नाम लिहा वाक्यातील क्रियापद ओळखा .
१. ……… गवत खातो.
उत्तर : नाम – घोडा
क्रियापद – खातो.
२. ………. पत्र लिहिते .
उत्तर : नाम – निलीमा
क्रियापद – लिहिते.
३. ……….. पुस्तक वाचतो.
उत्तर : नाम – सात्विक
क्रियापद – वाचतो.
४………. गवत खाते .
उत्तर : नाम – गाय
क्रियापद – खाते
५. ते……….. सुंदर आहे .
उत्तर : नाम – चित्र
क्रियापद – आहे .
६.ते……… मोठे आहे.
उत्तर : नाम – धरण
क्रियापद – आहे
प्रश्न ९ . रिकाम्या जागी योग्य क्रियापदे लिहा .
अ ) सुधीर गोष्ट ………..
उत्तर : सुधीर गोष्ट सांगतो .
आ ) ते झाड उंच ………..
उत्तर : ते झाड उंच आहे .
इ ) रोझी गाणे ………..
उत्तर : रोझी गाणे गाते .
ई ) ती वेल हिरवीगार …………
उत्तर : ती वेल हिरवीगार आहे .
- चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा त्या शब्दांची कार्डे तयार करा .
उत्तर :
- पंखा
- पाट
- पतंग
- दीपक
- कपाट
- कणीस
- मडके
- हवा
- नदी
- गाय
- केळ
- गाजर
- विमान
- विळी
- माकड