प्र.१. का ते लिहा.
(अ) रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
उत्तर. वार्षिक परीक्षा संपली त्यामुळे आगगाडीने मामाच्या गावाला जायला मिळणार म्हणून रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
(आ) मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
उत्तर. बाळ मुलाकडे बघून हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
(इ) मुलाचे मन आनंदने थुईथुई नाचू लागले.
उत्तर. मामाच्या घरी बैलगाडीतून जाताना पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ, पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या घराच्या रस्त्यावर पानांची सळसळ नदीच्या पाण्याची खळखळ, झाडातील पक्षांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गाईंचे हंबरणे, बकऱ्याचे बें बें ऐकून शेत पाहून मुलांचे मन आनंदाने थुईथुई नाचायला लागले.
(ई) मुलांना गहिवरून आले.
उत्तर. मामाच्या घरी मामी, मामाची मुले राजू आणि चिमी यांना कडकडून भेटल्यामुळे व आजीने जवळ घेऊन डोक्यावरून तिचा प्रेमळ हात फिरवल्यामुळे मुलांना गहिवरून आले.
प्र. २. ‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलांना का वाटले? तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर. मामाच्या घरी गेल्यावर मुले खूप आनंदात होती. त्यांची मामी, मामे-भावंडं, आजी भेटली. त्या सर्वांनी खूप धमाल केली. विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या आंबे तोडून खाणे. मामासोबत बैलगाडीतून फेरफटका मारणे अशी मुल्लाणी मजा केली. म्हणून सुट्टी कधी संपले ते आम्हाला समजलेच नाही असे मुलांना वाटले.
प्र. ३. वाचा. सांगा. लिहा.
(अ) नादमय शब्द
उदा. छुमछुम, झुकझुक.
उत्तर. १. भुरभुर २. लुकलुक ३. फडफड ४. टुकुटुकु ५. खुळखुळ
६. सळसळ ७. किलबिल ८. खडखड ९. सळसळ १०. थुईथुई
प्र.४. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
उत्तर. (अ) वर- अनिल (आ) तोंड- मुख (इ) रस्ता- मार्ग
(ई) आई- माता (उ) शेत-
प्र. ५. जोड्या जुळवा.
उत्तर. ‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) आगगाडी (३) झुकझुक
(आ) पैंजण (५) छुमछुम
(इ) घुंगुरमाळा (१) खुळखुळ
(ई) बैलगाडी (२) खडखड
(उ) पाणी (४) खळखळ
प्र. ६. ‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
उत्तर. (अ) बकरी – बें बें
(आ) वाघ-डरकाळी
(इ) बेडूक- डराव-डराव
(ई) कुत्रा-भुंकणे
(उ) मांजर-म्याव
(ऊ)मोर-
प्र. ७. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
(अ) खुद्कन हसणे.
उत्तर. सुरेशला खड्ड्यात पडलेला पाहून मीना खुद्कन हसली.
(आ) गाढ झोपणे.
उत्तर. दिवसभर शाळा, अभ्यास आणि परिक्षा करून मुले रात्री गाढ झोपली.
(इ) कडकडून भेटणे.
उत्तर. शाळा सुरु झाल्यावर माझ्या प्रिय मित्राला सागरला मी कडकडून भेटेन.
(ई) टुकूटुकू पाहणे.
उत्तर. मालकाने आणलेल्या नवीन मांजराकडे त्यांचा कुत्रा टुकूटुकू पाहत होता.
(उ) आनंदाने थुईथुई नाचणे.
उत्तर. पहिल्या पावसात मुले आनंदाने थुईथुई नाचत होती.
(ऊ) गहिवरून येणे.
उत्तर. अनिकेतच्या लाडक्या शिक्षिका शाळा सोडून जाताना त्याला गहिवरून आले.
प्र. ८. ‘बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.
उत्तर. १.घुंगूरमाळा २.आगगाडी ३.थंडगार
प्र. ९. तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
उत्तर. मी बिल्डिंग खाली खेळात असताना गोखले आजींच्या हातातली भाजीची पिशवी पडताना मी पहिली. सगळी भाजी जमिनीवर पसरली होती. ते बघून मी धावत जाऊन आजीच्या पिशवीतून पडलेल्या भाज्या तिच्या पिशवीत भरून दिल्या. आजीला खाली वाकता येत नव्हते. त्यामुळे मी भाजा गोळा केलेल्या पाहून ती खूप खूष झाली. आणि तिने माझे कौतुक केले.
प्र. १०. तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
उत्तर. सुट्टीच्या दिवशी आई-बाबा सगळेच घरात असतात. ते असले कि सकाळी त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ जातो. मग सर्व एकत्र मिळून नाश्ता करतो. कधीकधी नाश्ता आम्ही मुलेच बनवतो. घरातल्या कामात आईला मदत करतो. तिची छोटी छोटी कामे आम्हाला जमेल तशी करून देतो. मी आणि माझा दादा मिळून आंघोळ करतो. खाण्याची पैज लावतो. अशी आम्ही खूप मज्जा करतो.
प्र.११. खालील शब्दांसारखे दोन-दोन शब्द लिहा.
उत्तर. (अ) सळसळ – कळकळ, मळमळ
(आ) भुरभुर – हुरहुर, चुरचुर
(इ) लुकलुक – चुटपुट , रुखरुख
(ई) खडखड – बडबड, धडधड
प्र. १२. हे शब्द असेच लिहा.
उत्तर. उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.
प्र. १३. खालील शब्द आपण कधी वापरतो?
उत्तर. १.कृपया- विनंति करणे.
उदा. कृपया कचरा रस्त्यात टाकू नये.
२. माफ करा – चूक झाल्यावर क्षमा मागणे.
उदा. चुकून सचिनचा धक्का जोरात कुणालला लागल्यामुळे त्याने कुणालची माफी मागितली.
३. आभारी आहे – आभार प्रदर्शन करणे.
नोकरी मिळाल्यावर अभयने देवाचे आभार मानले.
- आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो, कि त्यास एकवचन म्हणतो आणि अनेकांबद्दल बोलू लागलो, कि त्यास अनेकवचन म्हणतो. उदा., एक झाड – अनेक झाडे.
खालील शब्दांच्या जोड्या वाचा व समजून घ्या.
| अ. क्र. | एकवचन | अनेकवचन | अ. क्र. | एकवचन | अनेकवचन |
| (१) | छत्री | छत्र्या | (४) | अंगठी | अंगठ्या |
| (२) | डोळा | डोळे | (५) | बांगडी | बांगड्या |
| (३) | पाटी | पाट्या | (६) | पुस्तक | पुस्तके |
- खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
(अ) बाबांचा सदरा उसवला.
(आ) सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.
(इ) पाकिटात पैसे नव्हते.
(ई) मुले बागेत खेळत होती.
(उ) समोरून बैल येत होता.
(ऊ) सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.
(ए) पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.