प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) विजा केव्हा चमकल्या?
उत्तर. दुपारच्या वेळी विजा चमकल्या.
(आ) सुटलेला वारा कसा होता ?
उत्तर. सुटलेला वारा भयभीत करणारा होता.
(इ) पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
उत्तर. पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली.
(ई) आलेल्या पाऊसामुळे बाबांनी चडफड का केली?
उत्तर. बाबांना उशीर होत होता, आणि पाऊस पण आला होता म्हणून त्यांनी चडफड केली.
(उ) पाऊसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
उत्तर. पाऊसामुळे आईचे पापड भिजले.
प्र. २. (अ) शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
उदा., वारा-गारा
उत्तर. (अ) कुत्री – छत्री
(आ) गिल्ला – किल्ला
(इ) पापड – चडफड
(ई) पळा – घोटाळा
(उ) कुट्टी – सुट्टी
प्र. २. (आ) कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.
कडकड – धडधड
चडफड – धडपड
तडफड – पडझड
प्र. ३. खालील शब्दांचे वचन बदला.
उत्तर. (अ) माणूस – माणसे
(आ) गाय – गायी
(इ) दप्तर – दप्तरे
(ई) पाणी – पाणी
(उ) वह्या – वही
(ऊ) पत्र – पत्रे
प्र. ४. अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
उत्तर. अचानक आलेल्या पावसामुळे खूपवेळा फजिती झाली आहे. आमची खूप तारांबळ उडाली. शाळेत जात असताना अचानक आलेल्या पावसाने आम्ही चिंब भिजलो. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यातील खड्ड्यातले पाणी आमच्या अंगावर उडून आमचा गणवेश खराब झाला. त्यामुळे आम्हाला शाळेत जाता नाही आले.
प्र. ५. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
उत्तर. दिवाळीत आलेल्या पावसामुळे खूपच धांदल उडाली होती. आकाश कंदील भिजला व दिव्यांमध्ये पाणी जमले. दारासमोर काढलेली रांगोळीसुद्धा पाण्याने भिजली. आम्हाला फटाके सुद्धा फोडता आले नाहीत.
प्र. ६. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
उत्तर. अ) रिमझीम पाऊस पडत होता.
आकाशात इंद्रधनुष्य दिसत होता.
ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता.
मी मित्रांसोबत पावसात भिजायला गेलो.
आईने छान कांदा भजी बनवले.
आम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला.
आ) रिक्षा खडखडत रस्त्यामध्ये थांबली.
आणि रस्त्यामध्येच बंद पडली.
काही करता ती चालूच होईना.
शेवटी आम्ही चालत चालत शाळेत आलो.
त्यामुळे शाळेत पोहोचायला आम्हाला उशीर झाला.
प्र. ७. वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
“वारा”
१) मंदमंद – मंद-मंद वारा मनाला शांत करून गेला.
२) गिरक्या – गोल-गोल गिरक्या घालत वारा वादळ घेऊन आला.
३) जोरदार – जोरदार वाऱ्यामुळे ढग पुढे-पुढे सरकू लागले.
४) थंडगार – पाऊस पडून गेल्यानंतर थंडगार वारा सुटला होता.
५) झोंबणारा – झोंबणारा वारा थंडी वाढवत होता.
प्र. ८. पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
उत्तर. पापड विविध पदार्थांपासून बनवले जातात. जसे उडिदाच्या डाळीचे पापड, तांदळाचे पापड, नाचणीचे पापड, पोह्यांचे पापड, बटाट्याचे पापड, साबुदाणा पापड, सोयाबीन पापड.
प्र. ९. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा.
उदा. पापड.
उत्तर. आई उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारचे साठवणीचे पदार्थ बनवते. अनेक प्रकारची लोणची, सांडगे, कुरडया, मुरंबा, मुखवास वगैरे..
प्र. १०. पावसाळा सुरु होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा. छत्री खरेदी करणे.
उत्तर. पावसाळा सुरु होताच आम्ही पावसापासून बचावाची तयारी सुरु करतो.
१. रेनकोट (जलरोधक कपडे) खरेदी करणे.
२. पावसाळी चप्पल खरेदी करणे.३. छत्री खरेदी करणे.