प्र. १. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?

उत्तर. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करून सुगरण पक्षी घरटे बांधतो.

(आ) सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?

उत्तर. निंब आणि बाभळीच्या झाडाच्या फांदीला सुगरण पक्षी घरटे बांधतो.

(इ) सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?

उत्तर. कसबी विणकर हा सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण आहे.

प्र. २. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?

उत्तर. सुगरण पक्षी आपल्या चोचीने सुबक वीण घालतो.

(आ) सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?

उत्तर. सुगरण पक्ष्याचे घरटे मजबूत असते म्हणून ते वादळात शाबूत राहते.

(इ) नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?

उत्तर. सुगरण पक्षी कुठेही घाई गडबड न करता नियोजनबद्ध पद्धतीने आपले घरटे बांधते, असे नयना म्हणाली.

किंवा

सुगरण पक्ष्याला बघून नयना म्हणाली,”कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध.”

(ई) सुगरण पक्षी कुटुंब वत्सल कसा? ते लिहा.

उत्तर. सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी (मादीसाठी) व पिल्लांसाठी सुरेख व मजबूत घरटे बांधतो. व त्यासाठी अपार मेहनत घेतो म्हणून तो कुटुंबवत्सल पक्षी आहे.

(उ) सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?

उत्तर. सुगरण पक्षी आपल्या चोचीने खूप आकारबद्ध घरटे बांधतो तसे घरटे मानवाला सुद्धा विणता येणार नाही म्हणून त्याला कसबी विणकर म्हटले आहे.

प्र. ३. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. 

उत्तर.

अ. क्र.“अ” गटअ. क्र.” ब ” गट
(अ)शाबूत राहणे(२)टिकून राहणे
(आ)वाखाणणे(३)स्तुती करणे
(इ)सर येणे(१)बरोबरी करणे

प्र. ४. खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

(अ) सुबक – मालतीने घरासमोर खूप सुबक रांगोळी काढली होती.

(आ) कसब – चित्रकाराने आपले कसब वापरून हुबेहूब चित्र काढले.

(इ) चिकाटी – गिर्यारोहक मोठ्या चिकाटीने गिर्यारोहण करतात.

(ई) मजबूत – नात्यांचे बंध हे खूप मजबूत असले पाहिजेत.

प्र. ५. तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.

उत्तर. पाठात सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात चिकाटीने व मेहनतीने काम केले पाहिजे. आपली सगळी कामे आपण नीटनेटकेपणाने व संयम ठेऊन केली पाहिजेत. जर आपण हाती घेतलेल्या कामात अपार मेहनत घेतली तर आपण नक्कीच यशस्वी होतो व सर्वजण आपली स्तुती करतात.

प्र. ६. तुम्ही सुगरण पक्षाचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.

उत्तर. विद्यार्थ्यांनी हे कार्य स्वतः करावे.

प्र. ७. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.

प्र. ८. सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.उत्तर. विद्यार्थ्यांनी हे कार्य स्वतः करावे.