प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. 

(अ) चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?

उत्तर : चर्नीरोड उद्यानात केळूस्कर गुरुजी पुस्तक वाचण्यासाठी येत. . 

(आ) उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?

उत्तर : उद्यानात बसून एक विद्यार्थी पुस्तक वाचत बसला होता त्याच्याकडे गुरुजींचे लक्ष गेले.

(इ) गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करावी असे का वाटते?

उत्तर : उद्यानात वाचत बसलेला विद्यार्थी इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसला नाही म्हणून गुरुजींना        त्याची विचारपूस करावी असे वाटले.

(ई) केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?

उत्तर : चर्नीरोड उद्यानामध्ये केळूस्कर गुरुजी रोज डॉक्टर आंबेडकरांना भेटत होते व त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले होते म्हणून केळूस्कर गुरुजी व डॉक्टर आंबेडकर यांची गट्टी जमली. 

(उ) डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?

उत्तर : जगातील एक विद्वान बनण्याचा नावलौकिक डॉक्टर आंबेडकरांनी मिळवला. 

प्र. २. खालील वाक्ये कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

  1. “बाळ तुझं नाव काय?”

उत्तर : हे वाक्य केळूस्कर गुरुजी यांनी उद्यानात बसलेल्या मुलाला म्हटले आहे.  

  1. “चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.”

उत्तर : हे वाक्य केळूस्कर गुरुजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले आहे. 

  1. “मला ती पुस्तके वाचायला आवडतील!”

उत्तर : हे वाक्य उद्यानात बसलेल्या मुलाने केळूस्कर गुरुजींना म्हटले आहे . 

प्र. ३. असे का घडले? ते लिहा.

  1. केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुतूहल निर्माण झाले.

उत्तर : केळुस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुतुहल निर्माण झाले  कारण तो इतर मुलांसारखा मस्ती करत नव्हता. तर तो एका बाकावर बसून पुस्तक वाचत होता. 

  1. भीमराव उद्यानात वाचत बसायचे.

उत्तर : भीमराव उद्यानात वाचत बसायचे कारण त्यांना शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची आवड होती म्हणून शाळा सुटल्यानंतर ते पुस्तके वाचत बसायचे. 

  1. गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

उत्तर : चर्नीरोड उद्यानात केळूस्कर गुरुजींची व भीमराव यांची रोज भेट होऊ लागली होती.  गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले होते, त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली आणि केळूस्कर गुरुजी आणि भीमराव यांची गट्टी जमली. 

  1. गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.

उत्तर :  गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली व त्यानंतर त्यांनी भीमरावला इतर लेखकांची पुस्तके वाचायला देईल असे सांगितले.  त्यावर भीमरावने, ‘जरूर द्या गुरुजी. मला ती पुस्तके वाचायला आवडतील’ असे उत्तर दिले.  त्यामुळे मोठ्या मायेने गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. 

  1. गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.

उत्तर : गुरुजींना भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केली.  

प्र. ४. पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.

(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.

(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.

(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.

उत्तर :

  1. गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
  2. त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
  3. गुरुजी मुलाजवळ आले.
  4. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
  5. गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
  6. डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

प्र. ५. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.

(अ) तुझ्याजवळ – तुज, जवळ, जळ, वळ, तुझा

(आ) दिवसापासून – दिवसा, दिवस, पासून, वास, सून, दिन, वन

(इ) मार्गदर्शन – मार्ग, दर्शन, मान, दमा

(ई) आवडतील – आवड, वाद, आड, आतील, आव

प्र. ६. खालील शब्दांचे वचन बदला.

(अ) लेखक – लेखक 

(आ) पुस्तक – पुस्तके 

(इ) शाळा – शाळा 

(ई) भेट – भेटी 

(उ) शिफारस – शिफारसी

(ऊ) शब्द – शब्द

प्र. ७. आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव

(आ)  जन्म स्थळ 

(इ) जन्मदिनांक 

(ई) आई – वडिलांचे नाव

(उ) शिक्षण 

(ऊ) लिहिलेली पुस्तके

(ए) कार्य

उत्तर : विद्यार्थ्यानी हे कार्य स्वत: करावे . 

प्र. ८. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

शब्द – सुशब्द, अपशब्द

स्पष्ट – सुस्पष्ट, अस्पष्ट

बुद्धी – सुबुद्धी, बुद्धिमत्ता, बुद्धिमान, निर्बुद्ध, दुर्बुद्धी

प्र. ९. खालील शब्द असेच लिहा.

उद्यान,  हायस्कूल,  मुख्याध्यापक,  विद्याव्यासंगी,  विद्यार्थ्यी,  तिसऱ्या,  दुसऱ्या,  सर्वसामान्य,  निश्चित,  मार्गदर्शन,  पद्धतशीर,  विस्तृत, अभेद्य,  गट्टी,  तल्लख,  बुद्धिमत्ता,  महाविद्यालयीन,  शिक्षण,  स्वतः,  विद्वान,  प्राप्त,  व्रात्य,  विद्याविभूषित,  उच्च,  स्वतंत्र.

  • सांगा पाहू.
  • कधी हातावर, कधी भिंतीवर

जाऊन मी बसतो,

तीन हात माझे सतत

फिरवत मी असतो,

वेळ वाया घालवू नका

असा नेहमी उपदेश करतो.

उत्तर : घड्याळ

  • शिस्तीचे धडे

उत्तम गडे,

कंकण शोधते

कधीच न रडे.

उत्तर : मुंगी