प्र. १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
१. झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
उत्तर : पावसाळयाचे दिवस होते. त्यामुळे झाडांना तसेच शेतातील पिकांना भरपूर पाणी मिळाले होते त्यामुळे झाडे, शेते हिरवीगार झाली होती.
२ . कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
उत्तर : कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती. आणि ती लवकरच पोहण्यात तरबेज झाली होती.
३. कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
उत्तर : कुंदा खेळत असताना तिला नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे ती धावत नदीकडे गेली . नदीवर पोहचल्यावर कुंदाने पहिले की रझिया पाण्यात गटांगळ्या खात होती आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती .
४. नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
उत्तर : “कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर..” अशी सूचना नदीकाठचे लोक कुंदाला देत होते .
५ . रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?
उत्तर : रझिया पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे चालली होती. पाण्याचा प्रवाह वाढत होता तरी कुंदाने रझियाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्या दोघींना सुखरूप व सुरक्षित पाहून रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.
प्र.२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) प्रसन्न x अप्रसन्न
(आ) दूरवर x जवळ
(इ) शूर x भित्रा
(ई) हसणे x रडणे
(उ) पुढे x मागे
(ऊ) लवकर x उशिरा
प्र. ३. पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला “जलतरणपटू” म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (१) वक्ता
(आ) धावण्यात पटाईत (२) क्रिकेटपटू
(इ) भाषण करण्यात पटाईत (३) धावपटू
उत्तर : ‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (१) क्रिकेटपटू
(आ) धावण्यात पटाईत (२) धावपटू
(इ) भाषण करण्यात पटाईत (३) वक्ता
प्र. ४. खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
(अ) क्रिकेट – चेंडूफळी , चेंडू , यष्टी
(आ) कबड्डी – मैदान
(इ) फुटबॉल – मोठा चेंडू
(ई) लिंबुचमचा – लिंबू आणि चमचा
(उ) संगीतखुर्ची – खुर्च्या आणि संगीत
(ऊ) विटीदांडू – विटी आणि दांडू
(ए) लगोरी – चेंडू, दगड (चपटे )
(ऐ) पोहणे – पोहण्याचा पोशाख, पोहण्याचा चष्मा
प्र. ५. कंसातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यांत योग्य ठिकाणी वापरा.
(दंग होणे, गलका वाढणे.)
(अ) शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला.
(आ) परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली.
प्र. ६. अंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चार-पाच वाक्यांत लिहा.
उत्तर : विद्यार्थ्यानी हे कार्य स्वत: करावे.
प्र. ७. तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
उत्तर : सर्वात आधी मी रझियाला पाण्याजवळ खेळू नको असे सांगेन. पण तरीही जर ती पाण्याजवळ खेळत असेल तर स्वत:ची काळजी घेऊन खेळ असे सांगेन. तसेच मी रझियाला लवकरात लवकर पोहायला शिकून घे हा सल्ला देईल .
प्र. ८. पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.
उत्तर : कुंदाचे गुण –
१. प्रसंगावधानता
२. साहस
३. परोपकारीपणा
४. निडरता
प्र. ९. कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकोनात लिहा.
उत्तर : नमस्कार कुंदा !
आज तू जे धाडस दाखवले आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक ! तुझ्या साहसी आणि धाडसी वृत्तीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. किती निस्वार्थीपणे तू रझियाचा जीव वाचवला. पण तू तुझी सुद्धा काळजी घे बर.
- खालील चित्रांना दोन-दोन विशेषणे लावा.
उत्तर : उंच, टोलेजंग
उत्तर : रसदार, ताजे
उत्तर : गोंडस, छोटासा
उत्तर : महाकाय, डौलदार