प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा.
(अ) कठीण गेलेला पेपर – गणित
(आ) वैष्णवीला पत्र लिहिणारे – बाबा
(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण – आंतरिक
(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ – पुस्तकांचा खाऊ
प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?
उत्तर : आईने दूरध्वनीवरून बाबांना सांगितले की वैष्णवी चा सहामाही चा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला आहे ,म्हणून ती फार निराश झाली आहे आणि पेपर होऊन घरी आल्यानंतर त्या दिवशी ती रडतही होती .
(आ) बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
उत्तर : बाबांना वैष्णवीला काही गोष्टी समजून सांगायच्या होत्या म्हणजेच त्यांना पत्र लिहून तिच्याशी हितगुज करायचे होते म्हणून बाबांनी दूरध्वनीवरुण बोलणे पसंत केले नाही .
(इ) गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
उत्तर : गणित विषय वैष्णवी चा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला काही उपाय सुचवले . त्यांनी वैष्णवीला गणिताशी मैत्री करायला सांगितले . त्यामुळे तिला गणिताची भीती वाटणार नाही . तसेच त्यांनी हे सुचवले की गणितातील संकल्पना ,संबोध ,क्रिया नीट समजावून घ्यावे व उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करावा .
प्र. ३. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
नृत्य – नाच
उशीर – विलंब
अवघड – कठीण
सुंदर – सुरेख
प्र. ४. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
कठीण – सोपे
अवगुण – सद्गुण
अपयश – यश
मैत्री – वैर
प्र. ५.
(अ) वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला –
छान गोष्टी सांगणे
उत्तम चित्र काढणे
सुंदर नृत्य करणे
(आ) बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण.
उत्तर : बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्व ही फुलवतात.
प्र. ६. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
उत्तर : टपाल सेवा , भ्रमणध्वनी संदेश , ई-मेल , इत्यादि .
प्र. ७. दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
उत्तर : हे कार्य विद्यार्थ्यानी स्वत: करावे.
प्र. ८. तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याचा स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
उत्तर : पत्रालेखन पहावे .
प्र. ९. ‘अपयश हि यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
- खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा.
(टवटवीत, उंच, नवा, शंभर)
(अ) हिमालय उंच पर्वत आहे.
(आ) कंपास घ्यायला आईने मला शंभर रुपये दिले.
(इ) बागेत टवटवीत फुले आहेत.(ई) ताईने मला नवा सादर दिला.