प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
१ . मिनू मासोळी कुठे राहायची?
उत्तर : मिनू मासोळी नदीच्या खोलगट भागात माशांच्या समुहात राहायची.
२. मिनूला समुद्र का बघायचा होता?
उत्तर : नदीचे पाणी समुद्रात जाते असे आईने मिनूला सांगितले होते. त्यामुळे मिनूला वाटत होते की समुद्र खूप मोठा आणि खूप खोल असणार, म्हणून मिनूला समुद्र बघायचा होता.
३. नदीचे पाणी गढूळ का झाले?
उत्तर : मुसळधार पाऊस पडत होता. जमिनीवरून पाणी नदीत वाहू लागले त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले.
४ . खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
उत्तर : खडकावर फुललेली फुलं लाल ,गुलाबी ,अंजीरी रंगांची होती .
५ . समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
उत्तर : समुद्राच्या खोलवर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही म्हणून तिथे अंधार असतो.
प्र. २. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
१ . लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर : लेखिकेने सांगितल्याप्रमाणे नदीत खूप पाणी होते. नदीचे पाणी निळे-निळे व थंडगार होते आणि ते इतके स्वच्छ होते की वळून पाहिले तरी त्यात तळाची वाळू दिसायची, गोल-गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे .
२. मिनूची व आईची चुकामूक का झाली?
उत्तर : एक दिवस खूप मुसळधार पाऊस पडू लागला होता . जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले होते . मासे बावरून एकमेकांना शोधू लागले म्हणून कोणीच कोणाला दिसत नव्हते . पाणी वेगाने वाहत होते त्यामुळे या गोंधळात मिनूची व आईची चुकामुक झाली .
३ . घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
उत्तर : घोडमाशाचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात त्याची छोटी-छोटी पिल्ले बसलेली होती आणि त्याचा रंग पिवळा होता. हे सर्व पाहून मीनूला हसू आले .
प्र. ३. कोण, केव्हा व कोणास म्हणाले ते लिहा.
१. “समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!”
उत्तर : हे वाक्य मिनूने स्वतःला म्हटले आहे. तिच्या तोडात जेव्हा खारट पाणी गेले आणि तिला समुद्र असण्याची जाणीव झाली तेव्हा तिने हे वाक्य म्हंटले आहे .
२ . “त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!”
उत्तर : जेव्हा एक पिवळा मासा मिनूच्या प्रश्नाचे उत्तर न देता गेला तेव्हा हे वाक्य कासवाने मीनूला म्हटले आहे.
३ . “घाबरू नकोस, हा तर खेकडा”
उत्तर : तिरका तिरका चालणारा प्राणी बघून मिनू जेव्हा कासवदादा जवळ उभी राहिली तेव्हा कासवाने हे वाक्य मिनूला म्हटले .
४ . “कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.”
उत्तर : हे वाक्य मिनूने परत नदीमध्ये जाताना कासवाला म्हटले आहे .
प्र. ४. शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? क्रमाने क्रिया लिहा.
उत्तर : शिंपल्यांचा पेटीत एक किडा बसलेला असतो चालताना तो आपले पाय फटीतून बाहेर काढून हळू चालतो प्ले शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचला लागतो म्हणून कीड आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो भोजन कमी नाही होत तरीसुद्धा तो तसाच रस गुंडाळत राहतो मग त्यातून शानदार मोती तयार होतो
प्र. ५. चार-पाच ओळींत वर्णन करा.
१. घोडमासा
उत्तर : घोडमासा – घोडमासा विचित्र दिसतो. घोडमासा हा पिवळ्या रंगाचा असतो. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला एक पिशवी असते. त्या पिशवीत त्याची पिल्ले असतात.
२ . खेकडा
उत्तर : खेकडा – खेकड्याचे डोळे बटबटीत असतात चालताना तिरका तिरका चालतो त्याच्या पाठीवर कठीण कवच असते त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. कधी कधी खेकड्याला सहा पाय असतात तर कधी आठ पायही असतात. त्याच्या तोंडाजवळ दोन नांग्या असतात त्यामुळे त्याचं संरक्षण होतं व त्याला पक्ष पकडता येते.
प्र. ६. ‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर : चिमुकली , लहानशी इत्यादि .
प्र. ७. (अ) समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा.
गरम = उष्ण
इवली = लहान
मोठे = प्रचंड
दूर = लांब
(आ) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
लहान X मोठे
टणक X मऊ
प्रकाश X अंधार
मागे X पुढे
प्र. ८. योग्य जोड्या लावा.
नाम विशेषण
(अ) मिनू (१) मुसळधार
(आ) पाणी (२) इवलीशी
(इ) डोळे (३) खारट
(ई) पाऊस (४) बटबटीत
उत्तर :
नाम विशेषण
(अ) मिनू (२) इवलीशी
(आ) पाणी (३) खारट
(इ) डोळे (४) बटबटीत
(ई) पाऊस (१) मुसळधार
प्र. १०. तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
उत्तर : हे कार्य विद्यार्थ्यानी स्वत: करावे .
- खालील वाक्यांतील काळ ओळखा.
(अ) सूर्य पूर्वेला उगवतो. = भूतकाळ
(आ) मला लाडू आवडला. = वर्तमान काळ
(इ) आईचा स्वयंपाक झाला होता. = भूतकाळ
(ई) मी गावाला जाईन. = भविष्यकाळ
(उ) तू का रडतेस? = वर्तमान काळ(ऊ) मी पोहायला शिकणार आहे. = भविष्यकाळ