प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ ) चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
उत्तर : चंद्रावरची शाळा एकविसाव्या शतकात भरेल .
आ ) चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
उत्तर : चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल.
इ ) चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
उत्तर : चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीचा डब्बा नेण्याची कटकट राहणार नाही .
ई ) चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
उत्तर : चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबण्याचा अभ्यास करावा लागेल.
प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ ) चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
उत्तर :चंद्रावरच्या शाळेत फक्त बटने दाबण्याचा अभ्यास करावा लागेल व चंद्रावर फक्त पोहोचले तरी पास केले जाईल .
आ ) चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
उत्तर : चंद्रावरच्या शाळेत जर उडी मारली तर फक्त तरंगत राहावे लागेल आणि आणि तिथे पीटीचा तास ही असाच होईल त्यामुळे फक्त चांदणी अशीच खेळायला मिळेल .
प्र. ३. योग्य कारण शोधा.
(अ) चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण….
(१) दप्तराऐवजी सिलिंडर न्यावा हा नियम असल्यामुळे
(२) चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.
(३) सिलिंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून.
उत्तर : चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.
(आ) चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण…
(१) शिक्षक अशीच पी.टी. शिकवतात.
(२) विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात.
(३) चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.
उत्तर : चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.
प्र. ४. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोध व लिहा.
उदा. भरेल-नसेल.
मुले-खुले
पाठीवरती-लागेल वरती
कटकट-पटपट
पहाल-रहाल
अभ्यास-पास
प्र. ५ ‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.
कटकट, झटपट, वटवट, झटझट, इत्यदि.
प्र. ६. कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
उत्तर : १. बटण
२. ऑक्सिजन
३. सिलेंडर
४. पी.टी.
५. पास
प्र. ७. तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.
उत्तर : चपाती भाजी, इडली चटणी, पोहे, पराठा
प्र. ८. कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात? का ते लिहा.
उत्तर : शाळेच्या डब्यामध्ये तेलकट, मांसाहारी तसेच पोषक तत्वे नसलेले पदार्थ आणू नये असे,
प्र. ९. चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हाला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.उत्तर : चंद्रावरच्या शाळेतून पृथ्वी गोलाकार व खूप सुंदर दिसत आहे. चंद्रावरून पृथ्वी चेंडू सारखी दिसते. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिचा रंग निळसर दिसत आहे.