प्र. १. तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.

तक्रार वनचर

(१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी

(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी           कपिला गाय

(३) विषारी जल                                       मासोळी

(४) वारूळ, शेत नष्ट                                 साप

प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ ) या पाठात कोणाकोणात संवाद झाला आहे?

उत्तर : या पाठात चिमणी, गाय, मासोळी, नागोबा यांच्यामध्ये संवाद झाला आहे. 

आ ) चिमणीला कोणता त्रास होता?

           उत्तर : चिमणीला माणसाच्या मोबाईल च्या आवाजाने त्रास होत आहे. चिमणी नाजूक असल्यामुळे   मोबाईल च्या आवाजाने तिची छाती धडधडते. त्या आवाजाने तिला खूप भीती वाटते.

इ ) गाईचे डोळे का पाणावले?

उत्तर : गाईच्या आजूबाजूला सगळीकडे प्लॅस्टिकचा ढीग तिला दिसत आहे. गवत खात असताना प्रत्येक घासाबरोबर तिच्या तोंडात प्लॅस्टिक जात आहे आणि त्यामुळे तिचे पोट सुद्धा बिगडत आहे. त्यामुळे गाईचे डोळे पाणावले. 

ई ) मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?

उत्तर : तलावातील पाणी विषारी झाले आणि त्यामुळे मासळी च्या जिवाची तगमग होते आहे असे मासोळी सांगते . त्याचबरोबर जल प्रदूषणामुळे इतरही प्राण्यांचे प्राण तडफडत आहेत . अशी समस्या मासोळी ने मांडली आहे . 

उ ) नागोबाची तक्रार कोणती आहे?

उत्तर : नागोबाला रहायला वारूळ किवा शेत उरले नाही कारण माणूस आपल्या अंधश्रद्धेमुळे सापांना पकडून नेतात आणि लाहया खायला देतात . ही नागोबाची तक्रार आहे . 

प्र. ३. घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्य लिहा.

   उत्तर : १. तहानलेल्या  ला घोटभर तरी पाणी पाजावे . 

             २. गावच्या शाळा मैल मैलभर लांब असतात . 

             ३ . तासभर थांबून पण मिराला बस मिळाली नाही . 

             ४ . कणभर भाताने श्री कृष्णाचे पोट भरले होते . 

             ५ . चमचाभर साखरेने चहा खूपच गोड झाला . 

प्र. ४. कोण ते सांगा (वनचर, भूचर, जलचर, उभयचर)

(१) पाण्यात राहणारे – जलचर

(२) जंगलात राहणारे – वनचर

(३) जमिनीवर राहणारे – भूचर

(४) जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे – उभयचर

प्र. ५. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

  1. किनारा – काठ, तीर

 २ )शेवट – अंत

 ३ )जल – पाणी

४) आठवण – स्मरण

५ ) मासा – मासोळी

 ६) नातेवाईक – सगेसोयरे

प्र. ६. खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद

प्र. ७. खालील शब्दांचे लिंग बदला.

(१) चिमणी – चिमणा 

(२) नाग – नागिन

(३) वाघ – वाघीन

प्र. ८. खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला. 

(उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पाणावणे, डोळे उघडणे.)

(अ) सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी कासावीस होत होता.

(आ) आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास होता.

(इ) पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे डोळे उघडले.

(ई) रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले.

प्र. ९. धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.

धडधड – बडबड, गडबड, रडरड, पडझड

तगमग – झगमग, लगबग, रगरग

  • खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा.

उत्तर : सिंह , हत्ती , बगळा , ससा , मोर , कबुतर , लांडगा , गाय , काळवीट , कावळा , कोब्रा ,  कोल्हा , जिराफ , उंट , गेंडा , घूस , गवा , टिटवी . 

  • वरीलप्रमाणे शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल.

शाळेचा परिसर स्वच्छ ठेवा.

शाळेची शिस्त पाळा.

कृपया कचरा करू नका. कचरापेटीचा वापर करा.

शांतता राखा.

  • ‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

पर्वत , पाणी आणि वातावरण प्रदूषित करणार नाही . 

झाडे लावून त्यांचे संगोपन करू. 

सर्व कीटक, पक्षी, जलचर यांना मित्र मानू .