प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

  अ ) अंगाची लाही लाही कशामुळे होते?

  उत्तर : उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. 

  आ ) अवखळ वारा सुटल्यावर काय होते?

  उत्तर : अवखळ वारा सुटल्यावर दुबळी बरोबर पालापाचोळा सुद्धा आकाशात उडतो .

  इ ) थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?

  उत्तर : रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही होते. वाटसरूंना खूप तहान लागते. त्यामुळे वाटसरूंना ग्लानीयेते . 

 ई ) पाणपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात?

 उत्तर : गरीब-श्रीमंत सगळेच पांगली वर पाणी पिण्यास येतात. 

  उ ) ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?

 उत्तर :  कडक उन्हात  रांजणात  असलेले  गार गार पाणी पिऊन मन तृप्त होते.  त्यामुळे ज्यांनी पाणपोई थाटली आहे त्याला आशीर्वाद देते. 

प्र. २. उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.

उत्तर : केरकचरा , मुलबाळं , गुरंढोंर , इत्यादि . 

प्र. ३. घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.

उत्तर : १ ) मुबईतल्या उकाड्यामद्धे प्रवास करताना सगळे घामेजून जातात . 

२ ) कडक उन्हात किल्ला चढताना आमच्या अंगाची लाही लाही झाली.

३ ) दुपारी १२ वाजता उन्हाच्या उष्मगरम झळाई लागत होती .

४ ) रखरखत्या उन्हात सुद्धा खेळाडू मैदानावर खेळत होते . 

५ ) उन्हाळ्यामद्धे सर्वांनाच खूप तहान लागते .

प्र. ४. रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा व लिहा.

उत्तर : खरखर, भरभर, टरटर, घरघर, सरसर, मरमर, इत्यादि . 

प्र. ५. पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या. 

उत्तर : पाणबुड्या, पाणलोट, पाणवठा, पाणथळ, पाणकोंबडा, पाणघोडा, पाणवनस्पती.

प्र ६. ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत . ती वाचा व समजून घ्या. 

C:\Users\Vaishali\Downloads\Screenshot_20211220-132321_Maharashtra board books (1).png

प्र. ७. खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) गार x गरम

(आ) रंक x राजा

(इ) ऊन x पाऊस

(ई) तृप्त x अतृप्त

(उ) दुवा x शाप

(ऊ) सज्जन x दुर्जन

प्र. ८. तुम्हाला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.

उत्तर :  पाणपोई पाहून सर्वात आधी माला खूप आनंद होईल . पाणी पिण्यासाठी भांडे शोधेल. मन तृप्त होईपर्यंत पाणी पिऊन झाले की पाणपोई बनवण्यार्‍याचे आभार मानेल . 

प्र. ९. चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.उत्तर : चालून चालून थकलेल्या वाटसरूला खूपच तहान लागते कारण त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळेस जर पिण्यासाठी थंडगार पाणी मिळत असेल तर त्याचे मन नक्कीच तृप्त होत असेल . पाण्याने थोडे पोटही भारत असेल . पुन्हा पुढे चालण्यासाठी त्याला थोडे बळ मिळत असेल . तहानेच्या वेळी अचानक मिळालेली पाणपोई त्याला खूपच महत्वाची वाटत असेल.