प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
- कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते?
उत्तर : कवीच्या अंगणामध्ये गहू, शाळू(ज्वारी) यांची रास पडते.
- रानमेवा कुठे उगवला आहे?
उत्तर : रानमेवा रानात उगवला आहे
- कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?
उत्तर : रान मेवा दिला- घेतल्याने आपापसातील प्रेम वाढते असे कवीला वाटते म्हणून कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे.
- कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
उत्तर : कवीच्या अंगणात धान्य पसरले आहे. ते दाणे टिपण्यासाठी पाखरे अंगणात येतात.
प्र. २. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.
- गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.
उत्तर : गहू शाळवाचं मोती
काळ्या रानात सांडलं.
- काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.
उत्तर : काळ्याशार मातीतुनी
मोती-पवळ्याची रास.
- शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.
उत्तर : जीव दमतो, शिणतो
घास भरवते माय.
- रानातला रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खाऊया.
उत्तर : रानातला रानमेवा,
तुम्ही आम्ही सारेजण
गुण्यागोविंदानं खावा.
प्र. ३. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.
उत्तर : शाळेच्या सुट्टीत मी नेहमी माझ्या आजी-आजोबांकडे गावाला जाते. गावाला मामाच्या शेतात गहू, बाजरी, मका असे सगळेच धान्य पिकते. मी जेव्हा शेतात फिरायला गेले तेव्हा मी पहिले की सर्व शेट हिरवेगार दिसत होते. मामाने मला संगितले की हे बाजरी चे शेत आहे. मी बाजरीचे पीक पहिले. त्यावेळी नुकतीच बाजरी ची कणसे आली होती. थोड्याच दिवसात ती कणसे भरून येणार होती. म्हणजे बाजरी तयार होणार होती.
खेळूया शब्दांशी.
(अ) कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची…………………….
(मिजास, आस, रास)
उत्तर : काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची रास
(२) घरामंदी घरट्यात जशी दुधातली
(माय, साय, जाय)
उत्तर : घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय.
(३) दार उडुनिया जाता, आसू येति
(गालावर, सारेजण, घरट्यात)
उत्तर : दार उडुनिया जाता, आसू येति गालावर
(आ) समूहदर्शक शब्दांची यादी करा.
उदा., धान्याची रास
(१) लाकडाची – मोळी
(२) केळीचा – घड
(३) मुलांचा – घोळका
(४) पक्ष्यांचा – थवा
(५) प्राण्यांचा – कळप
(६) द्राक्षांचा – घड
(इ) खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
(अ) सांडलं – पडलं
(आ) रास – मिजास
(इ) माय – साय
(ई) खालील शब्दांसाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
(अ) खावा – खाणे
(आ) माय – आई
(इ) घरामंदी – घरामध्ये
(ई) आसू – अश्रु
खेळ खेळूया
‘स’ चा शब्दपंखा पूर्ण करा
१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी. ससा
३. नेहमी.
४. एक शीतपेय
५. रस्ता
६. उत्सव
७. ढीग या शब्दासाठी कवितेतील शब्द आलेला शब्द. रा