प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

  1. कर्णागड कुठे वसलेला आहे?

उत्तर : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या खेडेगावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.  

  1. ‘गाडी थांबवा’, असे गोपाळ का ओरडला?

उत्तर : घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूला आग लागलेली दिसली. ती आग विझवली गेलीच पाहिजे असे गोपाळला वाटले म्हणून ‘गाडी थांबवा’ असे तो ओरडला. 

  1. गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?

उत्तर : गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तिनिशी ओढायला सुरुवात केली.  व तो लांबच लांब पाइप गोपाळने आगीच्या दिशेने ओढत आणला.

  1. आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?

उत्तर : आग वेळेवर विझली नसती तर गडावरील आदिवासी गुराखी व गाई-वासरं भाजून निघाली असती. 

प्र. २. कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

  1. “अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू?” 

उत्तर : हे वाक्य शिक्षक गोपाळला म्हणाले. 

  1. “माणसे असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!”

उत्तर : हे वाक्य गोपाळने गुरख्याकडे पाहून म्हणाले. 

  1. “पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो.” 

उत्तर : हे वाक्य शिक्षक दुसर्‍या गाडीतील गृहस्थाला म्हणाले. 

प्र. ३. गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला? का ते लिहा.

उत्तर : गोपाळची प्रसंगावधानता व निरपेक्ष वृत्ती हे गुण माला आवडले. गोपाळने आग बघितल्यावर ती विझलीच पाहिजे हा निश्चय केला. त्या साथी त्याने कोणाच्या मदतीची अपेक्षा केली नाही की वाट बघितली नाही. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्याने लगेच गाडीतून उडी मारली व एकट्यानेच जवळच्या शेतातून पाण्याचा पाइप ओढून आणला व सगळीकडे पाणी फेकू लागला. हे सर्व करताना त्याने स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. त्याने गडावरील गुरं व गुरख्यांचे प्राण वाचवले. 

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा.

(अ) कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.

(आ) ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.

(इ) तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला.

(ई) सर्वांचेच चेहरे उजळले होते.

उत्तर : 

क्रनामसर्वनामविशेषणक्रियापद 
अ)कर्णागडआहे
आ)ड्रायव्हरने, गाडीचावाढवला
इ)पाइप, गोपाळनेतोलांबआणला
ई)चेहरे

होते

(आ) कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा.

(अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी, पोशिंदा)

  1. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक ……………….. साक्षीदार आहेत.

उत्तर : सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

  1. भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ………………….होती.

उत्तर : भूज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती.

  1. शेतकऱ्याला भारताचा ………………….. म्हणतात.

उत्तर : शेतकऱ्याला भारताचा  पोशिंदा म्हणतात. 

  1. …………………….. काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहेमीच आवडतो.

उत्तर : कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहेमीच आवडतो.

(इ) ‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. ‘बिन’ , ‘परा’ हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

गैर : गैरहजर, गैरसोय, गैरसमज. 

बिन : बिनधास्त, बिनदिक्कत, बिनशर्थ, बिनकामाचा.  

परा : पराजय, पराधीन, पराभव, परावलंबी.  

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा.

  1. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.

उत्तर : माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. 

  1.  मंदा लिहिताना नेहमी चुका करते.

उत्तर : मंदा लिहिताना नेहमी चुका करते.

  1. आईने आशाला शंभरदा बजावले.

उत्तर : आईने आशाला शंभरदा बजावले. 

  1. सभोवार दाट झाडी होती.

उत्तर : सभोवार दाट झाडी होती.

कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.

(समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा.)

  1. ……………… वाहतुकीची साधने कमी होती.

उत्तर : पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती.

  1.  मी ……………… पाणी प्यायलो.

उत्तर : मी घटाघटा पाणी प्यायलो.

  1. मला आई येताना दिसली.

उत्तर : मला आई समोरून येताना दिसली. 

  1. ………………….. हिरवेगार गवत उगवले होते.

उत्तर : सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते.