प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
- विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
उत्तर : विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रातर्फे पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती. त्यावेळी आलेल्या ताई-दादांनी सांगितलेली माहिती ऐकून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.
(आ) अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?
उत्तर : माळढोक पक्षी हा शेतकर्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो त्यामुळे त्याची संख्या फार कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली, तेर संख्या आणखीनच कमी होते.
- खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा व लिहा.
उत्तर : थोडासा , मोजके, काही, हळू, आज, जरा, रोज , अनेकदा, कदाचित, तिकडे, खाली, वर, सावकाश, काल.
वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे?
उत्तर : ही सूचना २३ सप्टेंबर २०२१ ला देण्यात आली आहे.
- पाणीपुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे?
उत्तर : पाणीपुरवठा २४ सप्टेंबर २०२१ ला बंद करण्यात येणार आहे.
- पाणीपुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे?
उत्तर : पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइनच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू केल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
- पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे?
उत्तर : पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आली आहे.