प्र. १. केव्हा ते लिहा.
- पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले.
उत्तर : आई, दादा, बाबा, ताई आजारी पडले की त्यांना औषध म्हणून संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध मिळायचे. अशक्तपणा आला की शिराही रोज मिळायचा हे सर्व पदार्थ आजारी म्हणून सगळेजण खात असत.परंतु मुलाला मात्र त्या पदार्थांना हात लावण्याची सक्त मनाई असे, त्या वेळी मुलाला घरच्यांच्या दु:खातसहभागी व्हावे असे वाटले.
- मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
उत्तर : घरातील सगळेजण आजारी पडत होते व छान छान पदार्थ खत होते. ते सर्व इतक्या वेळा आजारी पडले होते की मुलाच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. त्यावेळी त्याने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
- मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
उत्तर : दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी मुलाला तपासले. इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. डॉक्टरांनी गळ्यातील नळी त्याच्या छातीवर लावली व त्याची जीभ बघितली त्यावेळी मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
- डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.
उत्तर : मुलाला तपासल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्याला सांगितले कि,” तुला काही झालेले नाही, तुझी तब्येत ठणठणीत आहे व तुला औषध मिळणार नाही.” हे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.
प्र. २. आकृत्या पूर्ण करा.
- मुलाच्या मते
↓ ↓
मोठे दुखणी छोटी दुखणी
↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓
टायफॉइड क्षय न्यूमोनिया थंडीताप खोकला पडसे
- मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधे
↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓
उत्तर : संत्री मोसंबी सफरचंद खडीसाखर बेदाणा पेढे गोड औषधे
प्र. ३. खालील तक्ता पूर्ण करा.
| आपण आजारी असताना काय करू शकत नाही? | आपण आजारी नसताना काय करू शकतो? |
| अभ्यास करणे , खेळणे , फिरायला जाणे हे करू शकत नाही. | अभ्यास करणे , खेळणे , फिरायला जाणे हे सर्व करू शकतो. |
| स्वत:ची कामे स्वत: करू शकत नाही. | स्वत:ची कामे स्वत: करू शकतो. |
| चमचमीत किवा बाहेरचे पदार्थ खाऊ शकत नाही. | चमचमीत किवा बाहेरचे पदार्थ खाऊ शकतो. |
प्र. ४. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल, ते लिहा.
उत्तर : घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना सर्वात आधी मी डॉक्टरकडे घेऊन जाईल. त्यांची औषधे ते वेळच्यावेळी घेतील हयाकडे लक्ष देईल. त्यांच्या जेवणासाठी त्यांना पौष्टिक पदार्थ बनवून घेईल. त्यांचे सर्व प्रकारे मनोरंजन करून त्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करेल.
- खेळूया शब्दांशी.
(अ) खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
अ ) डॉक्टर – वैदय
आ ) ऑपरेशन – शस्त्रक्रिया
इ ) मेडिसीन – औषधे
ई ) पेशंट – रुग्ण
- ‘गुलगुलीत बिछाना’ याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.


उत्तर :
| टवटवीत | फूल |
| चमचमीत | भाजी |
| ठणठणीत | आरोग्य |
| बटबटीत | डोळे |
| मिळमिळीत | जेवण |
| गुळगुळीत | दगड |
- खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.

औषधांपासून = मुलांना औषधांपासून लांब ठेवावे.
औषधांचा = औषधांचा वास इस्पितळाची आठवण करून देतो.
औषधांतून = औषधांतून आपणास आवश्यक रसायने मिळतात.
औषधांनी = औषधांनी आजार बरा होण्यास मदत होते.
औषधांच्या = औषधांच्या बाटल्या गडद रंगांच्या असतात.
औषधांवर = औषधांवर दिलेली तारीख बघून औषधे खरेदी करावीत.
औषध = औषध खाऊन माणसाचा आजार बरा होता.
औषधांना = औषधांना खूप वास येतो.
(ई) कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग करून खालील वाक्ये पूर्ण करा.
(सुचेनासे होणे, सक्त मनाई असणे, फुशारकी मारणे, ठणठणीत असणे)
(अ) सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत असते.
(आ) ध्वनीक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही सुचेनासे झाले.
(इ) जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप फुशारकी मारत होता.
(ई) तो रस्ता खाजगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्याला सक्त मनाई आहे.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
(अ) आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
(आ) मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली.
(इ) आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
(ई) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
आपली समस्या आपले उपाय-१
प्रश्न १. नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते ?
उत्तर : माणसांच्या वाईट सवयीमुळे, शहाराच्या सांडपाण्यामुळे, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे, कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.
प्रश्न २. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील?
उत्तर : नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडू नये, शहरातील सांडपाणी’ नदीत सोडू नये. तसेच शेतीत सुद्धा रासायनिक खतांचा वापर टाळला पाहिजे.
प्रश्न ३. जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो ?
उत्तर : जलपर्णी उगवल्याने पाणी दूषित होते.
प्रश्न ४. नदीमध्ये जलपर्णी होऊ नये, यासाठी काय कारला हवे, असे तुम्हाला वाटते ?
उत्तर : कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडू नये, शहरातील सांडपाणी’ नदीत सोडू नये. तसेच शेतीत सुद्धा रासायनिक खतांचा वापर टाळला पाहिजे. यामुळे नदीमध्ये जलपर्णी होणार नाही.

वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
उत्तर : ही जाहिरात पुस्तक प्रदर्शनाबद्दल आहे.
- कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे?
उत्तर : १५ ते २० ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
- पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा.
उत्तर : छोटयांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन
नामवंत साहित्यिकांची पुस्तके
विविध विषयांवरील पुस्तके
मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतीची पुस्तके
सायंकाळी ७ ते ८ या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी
- प्रदर्शन कोठे भरणार आहे?
उत्तर : प्रदर्शन शारदा विद्यालयाचे सभागृह भरणार आहे.
- शंभर रुपयांच्या खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे?
उत्तर : शंभर रुपयांच्या खरेदीवर २० रुपयांची सवलत मिळणार आहे.
- पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल, ते लिहा.
उत्तर : पुस्तक प्रदर्शनात मी गोष्टींची, विज्ञान प्रयोगांची व कोड्यांची पुस्तके खरेदी करेल.
- ओळख पाहू
(१) हात आहेत; पण हालवत नाही = खुर्ची
(२) पाय आहेत; पण चालत नाही = टेबल
(३) दात आहेत; पण चावत नाही = कंगवा
(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही. = सुई (५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही = ब्रश