प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
- सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?
उत्तर : सोनालीने अभ्यासाशिवाय रोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते.
- सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?
उत्तर : सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण तरीदेखील ती आईने दिलेले गोष्टींचे पुस्तक दुसर्यांदा वाचायला तयार झाली , हे पाहून सर्वांना नवल वाटत होते.
- सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले?
उत्तर : सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील सार्याच मुलामुलींना एकेक पुस्तक भेट स्वरुपात दिले.
प्र. २. खालील घटनांमागील करणे लिहा.
- आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
उत्तर : सोनालीला वाचनाची आवड लागावी म्हणून आईने एक दिवस एक युक्ती केली. सोनाली च्या हातात एक गोष्टीचे पुस्तक देऊन त्यातली एक गोष्ट आईने निवडायला सांगितली होती. ती गोष्ट मला शाळेत मुलांना सांगायची आहे, असे आईने सोनालीला संगितले.
- आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.
उत्तर : गोष्टींचे पुस्तक वाच्ल्यानंतर त्यातली कोणती गोष्ट निवडावी हे सोनालीला समाजात नव्हते. तिने ही समस्या आईला सांगितल्यावर आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला.
- सोनालीला आता ‘पुस्तके वाचत जा’, असे सांगण्याची गरज उरली नाही.
उत्तर : बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील सार्याच मुलामुलींना एकेक पुस्तक भेट स्वरुपात दिले. त्यामुळे सोनालीला आता ‘पुस्तके वाचत जा’, असे सांगण्याची गरज उरली नाही.
प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर : टीव्ही , व्हिडीओ गेम , कॉम्प्युटर , मोबाईल
प्र. ४. अभ्यासाबरोबर तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
उत्तर : अभ्यासाबरोबर मला सुंदर चित्र काढायला आवडतात. तसेच मला वाचनाची सुद्धा आवड आहे. नवनवीन लेखकांची नवनवीन पुस्तके मी वाचते.
- खेळूया शब्दांशी
(अ) खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
(अ) सफल होणे – यशस्वी होणे.
(१) यशासाठी झटणे. (२) यशस्वी होणे. (३) अपयश येणे.
(आ) नोंदी करणे – लिहून ठेवणे
(१) लिहून ठेवणे. (२) नोंदवही लिहिणे. (३) लक्षात ठेवणे.
(इ) आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे
(१) आनंद वाहून जाणे. (२) दुःखी होणे. (३) खूप आनंद होणे
(ई) नवल वाटणे – आश्चर्य वाटणे.
(१) आश्चर्य वाटणे. (२) खूप आनंद होणे. (३) नाराज होणे.
(आ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
(अ) आमूलाग्र – कोरोना काळात सर्व लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला.
(आ) शाबासकी – सीमाने तिच्या लहान भावाला सापापासून वाचवले म्हणून सर्वांनी तिला शाबासकी दिली.
(इ) अवांतर – अवांतर वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा.
- बक्षीस (आ) यश (इ) गोष्ट (ई) मदत (उ) आवड
| बक्षीस | पारितोषिक |
| यश | विजय |
| मदत | साहाय्य |
| गोष्ट | कथा |
| आवड | रस |
- खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.
आई : आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश : आई, तू बटाट्याची भाजी अन पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?

- वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो?
उत्तर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो
२) वरील बातमी कोणत्या तारखेची आहे?
उत्तर : वरील बातमी १६ ऑक्टोबरची आहे
३ वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले?
उत्तर : वाचन प्रेरणा दिन निमित्ताने ग्रंथदिंडी पथनाट्य व उत्कृष्ट वाचन स्पर्धा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
४ कोणत्या विद्यार्थ्यास ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून बक्षीस देण्यात आले?
उत्तर : इयत्ता सातवीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले
५ विद्यार्थ्यांमध्ये वाचनकौशल्य वाढावे, यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील, यावर गटात चर्चा करा. त्याची यादी तयार करा.
उत्तर :
विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे म्हणून मुलांचे गट पाडून वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करता येते.
शाळेत विविध स्पर्धांमध्ये बक्षीस स्वरूपात वेगवेगळे पुस्तके भेट देता येतात
तसेच शाळेत दर आठवड्यात एक दिवस वाचनालयाचा तास असतो