प्र. १. खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) वैष्णवीच्या शाळेत ‘बालदिन’ कसा साजरा झाला?
उत्तर : वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विदयार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून त्यात भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. वैष्णवीने स्वत: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विदयार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला.
आ) शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पहिली?
उत्तर : शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकवणारा कापूस अशी पिके पाहिली. तसेच त्यांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळांनी लदबदलेली फळझाडेही पाहिली.
इ) वैष्णवीचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा झाला?
उत्तर : वैष्णवीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला सकाळपासून घरातील नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ती तिच्या कुटुंबाबरोबर आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेली. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागांतल्या मुलामुलींना खाऊचे वाटप केले. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले. त्यांच्याकडे पाहून तिला शिकण्याची नवी उमेदही मिळाली.
प्र. २. का ते लिहा.
- वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वांत जास्त आवडले?
उत्तर : वैष्णवीच्या रोजनिशीतील १६ नोव्हेबरचे पान मला सर्वांत जास्त आवडले. तिने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक आणून घरी मेजवानी किंवा बाहेर सहलीला न जाता ती त्या दिवशी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट दिली. तेथे आपल्या आई वडिलांपासून दूर शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटण्याची कल्पना मला फार आवडली. म्हणूनच शिकण्याची नवी उमेद देणारे रोजनिशीतील हे पान मला सर्वांत जास्त आवडले.
- वैष्णवीला गहिवरून आले.
उत्तर ; आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील मुलांना वैष्णवी आपल्या वाढदिवसा निमित्त खाऊ वाटत होती. ती सर्व मुले आपल्या आई वडिलांना सोडून असे दूर केवळ शिक्षणासाठी तेथे राहत होती. म्हणून वैष्णवीला गहिवरून आले.
खेळ खेळूया.
- खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा.
(अति तेथे माती, आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)
अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराभव होतो. = गर्वाचे घर खाली.
आ) एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं. आणि काम झाल की त्याला सोडून द्यायचं. = कामापुरता मामा.
इ) सगळीकडे परिस्थिती समान असणे. = पळसाला पाने तीनच.
ई) थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. = थेंबे थेंबे तळे साचे.
उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. = आगीतून उठून फुफाट्यात पडणे.
ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. = अति तेथे माती. ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. = नावडतीचे मीठ अळणी.