प्र. १. उत्तर लिहा.
लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय
उत्तर : (१) चित्रकला (२) मूर्तिकला
प्र. २. काय ते सांगा.
(अ) मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.
उत्तर : गाईचं शेण आणि घोड्याची लीद .
(आ) लेखकाचा कॅनव्हास
उत्तर : खडक
प्र. ३. आकृती पूर्ण करा.
- लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष.
उत्तर : १. निसर्गरम्य २. सुसंस्कृत
- लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक
उत्तर :
- हिरवी रान
- दुथडी भरून वाहणारी नदी
- घनदाट जंगल
- निळे डोंगर
प्र. ४. योग्य जोड्या जुळवा.
अ गट ब गट
(१) पिवळा (अ) झाडांच्या पानापासून
(२) जांभळा (आ) दगडांपासून.
(३) भगवा (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून.
(४) हिरवा (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून.
उत्तर : अ गट ब गट
- पिवळा द गडांपासून
- जांभळा काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून
- भगवा शेंदरी झाडाच्या बियांपासून
- हिरवा झाडांच्या पानापासून
प्र. ५. एका शब्दात उत्तरे लिहा.
(अ) बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा – ब्रश.
(आ) चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद – कॅनव्हास.
(इ) लालभडक मातीपासून तयार केल्या जायच्या – मूर्ती.
(ई) ओल असताना जसे असते तसेच वाळल्यावरही असते – गाईचे शेण.
(उ) घोड्याच्या शेणाला म्हणतात –लीद.
प्र. ६. ‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर सांधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर : माणसाला एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर त्याची इच्छाशक्ती ही इतकी प्रबळ असते की त्याला ते काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. अशा वेळी आपले हे काम कसेही पूर्ण झाले पाहिजे असा विचार माणूस करतो. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधंनामधून तो ते काम पूर्ण करतो. जी साधने उपलब्ध नाहीत त्याचा विचार माणूस करत बसत नाही. आणि ते काम पूर्ण करतोच.
- खेळूया शब्दांशी
- खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.
डोंगर हिरवी राने सावली दाट निळे
उत्तर : नामे विशेषणे
राने हिरवी
डोंगर दाट सावली निळे