प्र. १. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?

उत्तर : कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कला-गुणांच्या क्षितिजावरती होणार आहे.

आ ) कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?

उत्तर : कवीच्या मते व्यक्तित्वाचा प्रयोगशाळेत तन सदृढ होईल व मन विशाल होईल. 

इ ) प्रगतीची नवपरिभाषा कोणती?

उत्तर : प्रगतीची नवीन परिभाषा नवीन स्वप्ने व नवीन आशा असेल. 

प्र. २. गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.

अ ) सुंदर जग  → कोणाचे 

उत्तर : फुलपाखरांचे

आ ) पसरणारा सुवास → कशाचा

उत्तर : आपुलकीचा

इ ) अमूल्य शिकवण → कोणाची

उत्तर : गुरुजनांची

ई ) पायाभरणी → कशाची

उत्तर : अस्तित्वाची

प्र. ३. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

अ ) कलागुणांचा क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण

१ सूर्योदय होऊन सकाळ झाली.

२. नवे युग उजाडले.

३. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

४ पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला.

उत्तर : ३. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

आ ) कवीच्या मते ‘मानवतेचे गुण’ म्हणजे-

१ मानवांचे युग.

२ नव्या विचारांचे युग.

३ माणसाच्या प्रगतीचे युग.

४ भेदाभेद नसलेले युग.

उत्तर : ३ माणसाच्या प्रगतीचे युग.

प्र. ४. योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट

 १ )  नव्या युगाच्या नभात अ ) व्यक्तित्वाची जडणघडण

२ )  प्रतिभेची प्रभात आ ) स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे.

३ )  पायाभरणी अस्तित्वाची इ ) नवनिर्मितीची पहाट

४ )  व्यक्तित्वाची प्रयोगशाळा ई ) नव्या विचारांच्या क्षेत्रात

उत्तर :  ‘अ’ गट ‘ब’ गट

१ नव्या युगाच्या नभात अ ) नव्या विचारांच्या क्षेत्रात 

 २ प्रतिभेचे प्रभात आ ) नवनिर्मितीची पहाट 

 ३ पायाभरणी अस्तित्वाची इ ) स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे 

 ४ व्यक्तित्वाचे प्रयोगशाळा ई ) व्यक्तित्वाची जडणघडण 

प्र. ५. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ ) ‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

उत्तर : प्रसिद्ध कवी “किशोर बळी” यांच्या ‘किशोर’ फेब्रुवारी २०१७ या मासिकातून घेतलेली ही कविता आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहे.  नव्या पिढीला कलागुणांचा विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत.  अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आव्हान कवी या कवितेतून करत आहेत. यासाठी आपले अस्तित्व सामर्थ्यशाली करायला हवे , मजबूत करायला हवे.  अस्तित्वाची पायाभरणी करणे म्हणजेच आपले अस्तित्व मजबूत करणे , आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे . यासाठी आपले तन म्हणजेच आपले शरीर, हे निरोगी असले पाहिजे.  आपली विचार करण्याची क्षमता तसेच आपली काम करण्याची पद्धत सुद्धा सर्व सामावून घेणारी असली पाहिजे.  म्हणजेच आपले मन हे विशाल असले पाहिजे आणि आपले शरीर हे सदृढ असले पाहिजे.  तरच आपण आपल्या व आपल्या देशाचा विकास घडवू शकतो . 

आ ) तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.

उत्तर : प्रसिद्ध कवी “किशोर बळी” यांनी प्रस्तुत ‘प्रभात’ या कवितेमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विभाग ज्ञानाची नवीन नवीन दालने खुली आहेत हे सांगितले आहे. तसेच नव्या पिढीला कलागुणांचा विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत.  लोकांनी आपला भेदभाव मिटवून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी एकत्र यावे असे ते चालना देतात.  विश्वातील प्रत्येक माणूस हा नवी स्वप्ने पाहतो.  त्यांच्या नवीन नवीन आशा असतात व त्या पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करतात.  सामान्य माणसाने विज्ञान-तंत्रज्ञानातील झालेल्या प्रगतीमुळे आपले जीवन झपाट्याने परिवर्तन केले आहे असे वाटते, आणि या विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेल्या विकासाला कवी “प्रगतीची नवी परिभाषा” म्हणतात. 

इ )  ‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीच्या तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.

उत्तर : विज्ञानामुळे समाजातील झालेला विकास पाहून कवी सर्वांना आव्हान करू इच्छितात की माणसांच्या मना-मनामध्ये जर कुठले भेदभाव असतील तर ते बाजूला सारून देशाच्या प्रगतीसाठी नव्या पिढीच्या कलागुणांचा विकास आणि विकासाच्या नव्या संधी सर्वांना मिळाल्या पाहिजे व ज्ञानाची नवीन नवीन दालने खुली केली पाहिजेत.  

प्र. ६. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

अ ) नभात – प्रभात

आ ) मनोहर – सुंदर

इ ) अस्तित्वाची – व्यक्तित्वाची

ई ) युगात – प्रभात

  • खेळूया शब्दांशी.
  • खलील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा . 

अ ) आकाश  – नभ

आ ) सुगंध – सुवास

इ ) सुंदर – मनोहर

ई ) शरीर – तन

आ ) विशेष्य – विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ब’ गट

१ . भव्य अ )  मन

२.  अमूल्य आ ) युग

३ . नवे इ ) शिकवण

४ . सुंदर ई ) पटांगण

५ . विशाल उ )  जग

उत्तर : ‘अ’ गट ‘ब’ गट 

१ .  भव्य अ ) पटांगण

  २ . अमूल्य आ ) शिकवण 

  ३ . नवे इ ) युग 

४ . सुंदर ई ) जग  ५ . विशाल उ ) मन