प्र. १. एका शब्दांत उत्तरे लिहा.
अ ) माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे
उत्तर : नयन कुमार
आ ) माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी
उत्तर : कर्णिका
इ ) वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी
उत्तर : नासिका
ई ) जिव्हाताई यांना संपत सामील करून घेणारे
उत्तर : दंतराज
उ ) सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते
उत्तर : मेंदूराजे
ऊ ) अजिबात काम न करण्याचा आरोप असणारे
उत्तर : पोटोबा
प्र. २. आकृती पूर्ण करा.
अ ) जिव्हाताईची कामे
उत्तर : १. गोड बोलणे. २. पदार्थांची चव चाखणे.
आ ) पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय
उत्तर : १ . स्वयंपाक घरात जाणार नाही. २. घास उचलणार नाही.
इ ) जिव्हाताईची तक्रार
उत्तर : पोटोबा म्हणेल तेवढेच जिभेला खावे लागते आणि आवडता पदार्थ अधिक खाल्ल्यास त्याचे गुरगुरणे सुरू होते.
प्र. ३. कारणे शोध व लिहा.
अ ) जिव्हाताई गप्प आहे, कारण…………….
उत्तर : जिव्हाताईला पोटोबाचा खूप राग आला आहे. रामराव आणि शामराव पोटोबाची महती गाणारा संवाद तिने ऐकला. त्यात ही सारी माणसं पोटासाठी सगळे कष्ट करतात, असे साफ कळले. यामुळे आपली फरपट होत असून सगळा मानसन्मान फक्त पोटोबाला मिळतो हा विचार जिव्हाताईला आला आणि तिला राग आला. म्हणून ती गप्प बसली.
आ ) पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण………….
उत्तर : पोटोबाला अधूनमधून गुरगुरायची सवय आहे. पोटोबा जर गुरगुरले नाही तर शरीराचे राज्य सुरळीतपणे चालवणे शक्य नाही म्हणून पोटोबा अधूनमधून गुरगुर करतो.
प्र. ४. स्वमत स्पष्ट करा.
अ ) आपण सगळे शरीररुपी राज्याचे सेवक आहोत’ या विधानाबाबत तुमचे मत.
उत्तर : आपल्या शरीराची रचना ही विविध अवयवांनी बनलेली आहे. प्रत्येक अवयवाला आपले आपले काम नेमूम दिलेले आहे. त्या पद्धतीने त्यांचे काम चालू असते. परंतु जर त्यातल्या एकही अवयवाचे काम बंद पडले तर शरीराची रचना बिघडते. आपले जीवनचक्र चालू राहण्यासाठी हे गरजेचे आहे. राज्य सुरळीत चालण्यासाठी जसे सगळे सेवक आणि नागरिक एकत्र येऊन काम करतात तसेच आपले शरीर सुरळीत चालावे म्हणून सर्व अवयवांनी एकत्र येऊन काम करावे.
आ ) पोटोबाबद्दल तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
उत्तर : पोटोबा बद्दल सर्वच इंद्रियांची ही तक्रार होती की सर्व अवयव त्यांना नेमून दिल्याप्रमाणे कामे करत असतात. परंतु पोटोबा मात्र काहीच काम करत नाही. उलट ते नेहमी गुरगुरतच असतात. जिभेला सुद्धा तेवढेच खावे लागते जेवढे पोटोबा सांगेल. तरी सुद्धा सर्व लोक पोटोबाची वाह वाह करतात. नासिकाला सुद्धा सतत श्वास व वास घेण्याचे काम करावे लागते, नयनकुमार पाहण्याचे काम करतात, कर्णिका ऐकण्याचे काम करून जीवनव्यावहारात मदत करते. जिव्हाताई गोड बोलते व पदार्थांची चव घेते, पदकुमार चालण्याचे काम करतात तसेच ते शरीराचा भार उचतात. पोटोबा मात्र आयते बसून असतात, असे सर्वाना वाटते.
- खेळूया शब्दांशी.
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घाला.
अ ) तो म्हणेल तेवढच खायच सक्ती असते माझ्यावर
उत्तर : तो म्हणेल तेवढच खायच सक्ती असते माझ्यावर !
आ ) हो हो आमची तयारी आहे
उत्तर : हो ,हो , आमची तयारी आहे.
- वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब
उत्तर :
| क्रियाविशेषणअव्यय | शब्दयोगीअव्यय | उभयान्वयीअव्यय | केवलप्रयोगीअव्यय |
| भरभर , सावकाश , सतत | पोटोबाविरुद्ध , कशासाठी , पोटोबामुळे , स्वयंपाकघरापर्यंत , तुमच्याबद्दल | आणि , किंवा , अथवा | बापरे , अबब |
इ ) खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा.
अ ) कान – कर्णिका
आ ) नाक – नासिका
इ ) हात – हस्तराज
ई ) पाय – पदकुमार
उ ) जीभ – जिव्हाताई