प्र. १. आकृत्या पूर्ण करा.

  1. लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा

↓         ↓ ↓ ↓

मनसोक्त खेळणे , हुंदडणे , झाडावर चढणे , पावसात चिंब भिजणे 

  1. लेखकाचे सुट्टीतील मजेशीर अनुभव

↓ ↓ ↓

पक्ष्यांचे चिवचिवने, थवे न्याहाळणे , जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे 

  1. तिसऱ्या सहस्रकातील परस्परसंबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे

↓ ↓

ई -मेल इंटरनेट 

प्र. २. एका शब्दांत उत्तरे लिहा.

  1. लेखक जिथे शिकले ते गाव

उत्तर : सांगली

  1. लेखकाला मिळालेला पुरस्कार

उत्तर : अर्जुन पुरस्कार

  1. खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण

उत्तर : जिम

  1. लेखकाचा आवडता खेळ

उत्तर : बॅडमिंटन

प्र. ३. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ ) लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व.

उत्तर : लेखकाच्या आयुष्यात व्यायामाचे खूप महत्त्व आहे.  त्यांच्यामते प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण न चुकता दोन वेळेस जेवतो, त्याप्रमाणे व्यायामही आपण केला पाहिजे.  ‘वेळ नाही’ ही सबब सांगू नये. खुल्या मैदानावरील व्यायाम, क्लबमधील व्यायाम अथवा जिममधील व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसातून किमान तास-दोन तास करावा असे लेखक आवर्जून सांगतात.  लेखक वयाच्या  ६६ व्या वर्षी सुद्धा न चुकता व्यायाम करतात. 

आ ) खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो.

उत्तर : खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त येते, प्रसंगाचा सामना कसा करावा हे कळते. खेळ आपल्याला कसे वागायचे हे तर शिकवतच परंतु जिंकण्याचा आनंद ही मिळवून देतात. कोणीही न शिकवता आपण टेनिसमध्ये प्रतिस्पर्ध्याने लावलेला चेंडू रेषेच्या आत आहे कि बाहेर पडतो हे स्वतः ठरवतो व त्याप्रमाणे ते खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो त्याप्रमाणे आपल्यासाठी चांगले काय व वाईट काय हे हि आपणच ठरवायला शिकू लागतो. म्हणजेच खेळामुळे निर्णय क्षमता वाढते व आपण स्वावलंबी होतो. 

प्र. ४. गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.

उत्तर : सहावीत असताना मी माझ्या आई- वडिलांबरोबर एकदा प्राणी संग्रहालया मध्ये गेलो होतो. तिथे वाघ, सिंह, हत्ती, लांडगा, कोल्हा, गेंडा, मोर, ससा, हरिण  इत्यादी  प्राणी पहिले. सगळे प्राणी त्यांच्या त्यांच्या कक्षेत स्थिरावले होते. नंतर आम्ही एका पिंजर्‍याजवळ गेलो. तिथे आम्हाला शहामृग दिसले. शहामृग पाहता पाहता माझा हात त्या पिंजर्‍यावर कधी गेला माला कळलेच नाही. माझ्या नकळत एका शहामृगने माझ्या बोटाचा चावा घेतला आणि तो तिथून पळाला. माला दुखापत नाही झाली . पण मला त्याची फार गमंत वाटली. 

पण थोड्या वेळाने आमच्या लक्षात आले की मी त्या शहामृगच्या पिल्लांबरोबर खेळत होतो, हे बहुतेक त्या शहामृगला आवडले नाही आणि मी तिथून दूर जावे म्हणून त्याने माझा चावा घेतला. 

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील तक्ता पूर्ण करा.

एकवचन अनेकवचन

पुस्तक पुस्तके

गाव गावे

मैदान मैदाने

नदी नद्या

आ) खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

१. सांगली हे महाराष्ट्रातले गाव आहे.

२. चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळते.

नामसर्वनामविशेषणक्रियापद
सांगलीमहाराष्ट्रगावहे

हेतुमचे तुम्हांला 



चांगले वाईट 
आहे

कळते