प्र. १. आकृत्या पूर्ण करा.
- सानुल्या झुळकेच्या इच्छा
उत्तर :
१. जिथे मन ओढ घेईल तिथे जावे .
२. कळीला हळुवार स्पर्श करून तिचा सुगंध सर्वत्र पसरावा.
३. हिरव्यागार शेतात व निळ्याशार नदीवर तरंग निर्माण करत जावे.
४. दिवसभर काम करून दमलेल्या व्यक्तीला बिलगून त्याच्या चेहर्यावर टवटवी आणावी.
- सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप
उत्तर :
१. थबकत, हळूहळू
२. कानोसा घेत
३. रमतगमत
४. भरारी घेत
५. स्वैर मन ओढ घेईल तिकडे
- सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे
उत्तर :
- कळीचा सुगंध दशदिशांचा उधळणे.
- दिवसभर कष्ट करून दमलेल्या जिवाचा थकवा दूर करणे.
- वातावरणात उत्साह चैतन्य प्रसन्नता भरणे.
प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
(अ)झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण
(१) तिला स्वातंत्र्य हसे असते.
(२) तिला सर्वत्र हिंडायचे असते.
(३) तिचे मन तिकडे ओढ घेते.
(४) तिला लोक आमंत्रण देतात.
उत्तर : तिचे मन तिकडे ओढ घेते.
(आ) वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण
(१) झुळूक स्वतःच गाणे गाते.
(२) तिथे गुराखी अलगूज वाजवतो.
(३) तिथे ध्वनिफित लावलेली असते.
(४) झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
उत्तर : झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
प्र. ३. परिणाम लिहा.
- झुळकेने कलिकेला स्पर्श केला-
उत्तर : झुळकेने कालिकेला स्पर्श केल्यावर कळी उमलेल व झुळकेबरोबर त्या फुलाचा सुगंध सर्वत्र दरवेळेल.
- बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
उत्तर : बकुळीच्या फुलांना झुळकेने स्पर्श केला तर ती साऱ्या बकूळ फुलांचा सडा डोहात पाडेल.
प्र. ४. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
- चुकलीमुकली लकेर-
उत्तर : आपण एखादे गाणे गुणगुणत असतो तेव्हा कधी कधी आपल्याला एखादी ओळ आठवत नाही म्हणून आपण फक्त त्याची तान ओठ बंद करून बोलतो , त्याला कवी चुकलीमुकली लकेर बोलतात .
- पाचूचे मखमली शेत-
उत्तर : पाचू म्हणजे हिरव्या रंगाचे मौल्यवान रत्न. त्याचा चमकदार हिरवा रंग मनाला स्पर्श करतो. कवी येथे शेताला पाचूची उपमा देत आहेत. त्या शेताच्या हिरवा रंग पाहून ते शेत पाचूचे आहे असे वाटते अशी कल्पना कवीने केली आहे.
प्र. ५. एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.
- झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
उत्तर : नदी, बाग, झरा, वेळूचे वन, शेत व डोह.
- कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू-
उत्तर : वसंत ऋतु
- झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
उत्तर : तिनी सांजा
- खेळूया शब्दांशी
(अ) कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
१ व्हावे – झुकावे
२ काठी – वाड्यापाठी
३ हळुवार – पसार
४ अलगूज – हितगूज
(आ) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
१ छोटी – सानुली
२ ताजेपणा – टवटवी
३ बोट – अंगुली
४ पावा – अलगूज
(इ) तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ ) झुळुकेची परोपकारी वृत्ती.
उत्तर : दिवसभर काम करून दमलेल्या व्यतीला बिलगून त्याचा क्षीण झुळकेला घालवायचा आहे. म्हणजेच इतरांच्या आयुष्यात आनंद, उस्ताह व ताजेपणा भरण्याचे काम झुळूक करत आहे . हयातून झुळुकेची परोपकारी वृत्ती दिसून येते.
आ ) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
उत्तर : प्रस्तुत कविता ‘झुळूक’ मला खूप आवडली. कवी दामोदर कारे’ ह्यांनी आपल्या मनाला वार्याची झुळूक होऊन काय काय करावे वाटते , ह्याचे खूप सुंदर वर्णन केले आहे. काय काय नवनवीन गोष्टी पाहता येतील व कोणकोणत्या गमती-जमाती करता येतील हे कवीने खूप सुंदर शब्दात मांडले आहे.
कल्पक होऊया.
- ‘तुम्ही पक्षी आहेत’ अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
उत्तर : निबंधलेखन पहावे.
- चला संवाद लिहूया.
नदी : काय रे ! झाड दादा, तू एवढा उदास का आहेस ?
झाड : काय सांगू ! नदी ताई , बघ ना ह्या मानवाने माझ्या कित्येक मित्रांना कापून टाकले . काय माहीत मला पण कधी कापतील.
नदी : हो रे दादा ! बघ ना , माझे पण पाणी किती दूषित केले आहे ह्या मानवाने !
झाड : मी तर मानवाची किती काळजी घेतो . त्यांना प्राणवायू देतो. फळे , फुले, अन्न देतो, सावली देतो . पण ते माझी अजिबात काळजी घेत नाही.
नदी : माझ्या पाण्याशिवाय तर मानव जीवन जगूच शकत नाही. आपल्या दोघांवरही मानवाचे जीवन पुर्णपणे अवलंबून आहे ; तरीसुद्धा मानव आपली अजिबात काळजी घेत नाही.
झाड : हे देवा ! मानवाला सदबुद्धी दे !