प्र. १. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

  1.  भारतात सर्वात पहिली रेल्वे  ………… येथून सुटली.

  (ठाणे/मुंबई/कर्जत/पुणे)

उत्तर : भारतात सर्वात पहिली रेल्वे मुंबई येथून सुटली.

  1.  रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ……………. ठेवले.

(तिकीट/बक्षीस/इनाम/प्रलोभन)

उत्तर : रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी इनाम ठेवले.

प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.

भारतातील पहिल्या रेल्वेच्या उदघाटनाची पूर्वतयारी

उत्तर : 

  1. पानं – फुलांचे हार तोरणे लावली 
  2. निशाने लावून १० मोठे खोलीवजा डबे शृंगारले. 
  3. इंजिनवर इंग्रजांचे मोठे निशाण फडकवले. 
  4. डब्यात गाडीच्या खुर्च्या, कोच यांवर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी जीजीभाई, नाना शंकरशेट आणि अनेक नगरशेट जामानिमा करून बसलेले.  

प्र. ३. आकृती पूर्ण करा.

  1. रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे – 

उत्तर : सर जमशेटजी जीजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट

  1. इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे –

उत्तर : मुंबई ते ठाणे 

  1. रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल

उत्तर : दिनांक १८ एप्रिल सन १८५३ 

  1. घाट उतरण्याची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे

उत्तर : करशेटजी आणि जमशेटजी 

प्र. ४. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

मुनीम, आश्चर्य, फुकट, सरळमार्गी, नावाजलेले, गंमत

उत्तर : 

मुनीम = गुमास्ते

आश्चर्य = नवल, अचंबा 

फुकट = मोफत 

सरळमार्गी = सपाटी

नावाजलेले = नामांकित 

गंमत = मौज 

प्र. ५. कारणे लिहा.

  1. रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.

उत्तर : इंग्रजांच्या काळात बनवलेली रेल्वे ही वाफेवर चालणारी होती. लोकांमध्ये भलत्याच अफवा पसरल्या होत्या. ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत गाडायला जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा डाव आहे, अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. म्हणून रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.

  1.  इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.

उत्तर : ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे अशी अफवा लोकांमध्ये पसरली होती त्यामुळे लोक रेल्वेने प्रवास कारला भीत होते. अशावेळी दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाची योजना सुरू केली. पैशाच्या लालुचीने ठाण्याचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले की, त्यांच्या घरचे लोक आजूबाजूला उभे राहून खूप रडायचे. त्यांची समजूत काढणे खूप त्रासाचे असायचे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले की चौकशी करणाऱ्यांचे घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले आणि नंतर रेल्वे प्रवासाची लोकांची भीती निघून गेल्याचे पाहून इनामे बंद करण्यात आली.

प्र. ६. स्वमत.

  1.  ‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.

उत्तर : या रेल्वेमुळे ठाणे ते मुंबई हा दिवसभराचा प्रवास अवघा सव्वा तासावर आला. याच रेल्वेने मुंबई -पुणे ही दोन शहरे जोडून टाकली. कारखानदारी, व्यापार, नोकरीधंदा यांमध्ये प्रचंड वाढ झाली.

व्यापारी मंडळी, नोकरदार मंडळी यांचे कामधंदयाचा निमित्ताने येणे-जाणे वाढले, वेळेची बचत झाली, कामाचा पसारा वाढला.कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक रेल्वेमुळे सहजपणे होऊ लागली. त्यामुळेच या शहरांची प्रगती वेगाने होऊ लागली. एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये भरच पडत गेली. नंतरच्या काळामध्ये रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभर विणले गेले. त्याचाच परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यामध्ये रेल्वेचे योगदान फार मोलाचे आहे.

  1. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
  2.  तुमच्या मते रेल्वप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.

उपक्रम

टेलिफोन, स्वयंपाकासाठीचा गॅस, संगणक, यांसारख्या आधुनिक साधनांपैकी कोणत्याही एका साधनाचा पूर्व इतिहास जाणून घ्या व तो रंजक पद्धतीने लिहा.