प्र.१. व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
व्यायामाचे फायदे
उत्तर :
- व्यायामामुळे अन्नपचन होते, रक्तव्यवस्था सुरळीत होते.
- शरीरातील स्नायू बळकट होतात. त्यामुळे मानव दीर्घायुष्य बनतो.
- व्यायामामुळे पित्त, कफ, वात या व्याधी सुद्धा कमी होऊन जातात.
- व्यायामामुळे प्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर स्वावलंबनाची प्रवृत्ती येते .
- व्यायामामुळे जडत्व दूर होऊन काम करण्याची स्फूर्ती येते.
- व्यायामामुळे रक्त व्यवस्था उत्तम होते, त्यामुळे विचारशक्ती कार्यरत होते.
प्र.२. चूक की बरोबर ते लिहा.
अ) व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
उत्तर : बरोबर
आ) व्यायामाने जडत्व वाढते.
उत्तर : चूक
इ) व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
उत्तर : चूक
ई) व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
उत्तर : बरोबर
प्र. ३. शब्दसमूहांबद्दल एक शब्द चौकटींत लिहा.
अ) आरोग्य देणारी
उत्तर : आरोग्यदायी
आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती
उत्तर : प्रतिकारशक्ती
इ) स्वतःची कामे स्वतः करणारा
उत्तर : स्वावलंबी
प्र. ४. व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.
व्यायामाविण
- व्यायामाविना शरीरामध्ये जडत्व वाढते.
- आपल्या शरीराची रक्तव्यवस्था खराब होते.
- पित्त, कफ, वायू याचे शरीरातील प्रमाण वाढते, त्यामुळे शरीरात आळस निर्माण होतो.
- शरीरामध्ये काम करण्याची स्फूर्ती राहत नाही.
- तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होते.
- व्यायाम केला नाही तर सात्विक भोजनही विकारी बनते.
प्र. ५. भावार्थाधारित.
अ) व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : जसे शरीराचा आळस हा आपला वैरी मानला जातो तसे व्यायाम हा माणसाचा आरोग्यदायी मित्र आहे आपण कितीही सात्विक भोजन केले आणि व्यायाम केला नाही तर आपल्याला आजार होऊ शकतात कारण व्यायाम केला नाही तर अन्नपचन सुरळीत होत नाही अण्णा पचन सुरळीत न झाल्यामुळे शरीरात चढत व येते तर व्यायाम केल्यामुळे अंगात तरतरी राहते रक्तव्यवस्था उत्तम होते आणि आपण मानसिक सुद्धा सुदृढ होऊन जातो व्यायामाने स्नायू बळकट होतात व मानव दीर्घायुष्य बनतो पित्त कफ वात या जर्जर व्याधींमुळे होणारे आजार व्यायामामुळे आपण दूर ठेवू शकतो म्हणजेच व्यायामामुळे माणसाची प्रतिकारक शक्ती वाढते व मनुष्य स्वावलंबी बनतो व सतत काम करण्याची स्फूर्ती व्यायामामुळे मनुष्याला मिळते
आ ) ‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्तीl कार्य करण्याचीll’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर : ‘राष्ट्रसंत’ श्री तुकडोजी महाराज- माणिक बंडोजी ठाकूर यांच्याद्वारे लिखित व्यायामाचे महत्त्व या पद्य पाठांमध्ये मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व कवींनी स्पष्ट केले आहे. व्यायाम हा माणसाचा शरीराचा एक मित्र आहे, असे कवी म्हणतात. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, मनुष्य स्वावलंबी बनतो. मनुष्याच्या शरीरातील जडत्व कमी होते व अंगात तरतरी राहते. मानवाची मानसिक शक्ती सुद्धा सुदृढ राहते. म्हणजेच मनुष्याच्या अंगी काम करण्याची स्फूर्ती येऊ लागते आणि तो कोणावरही अवलंबून राहत नाही.
इ ) ‘आरोग्यम धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.उत्तर : व्यायामामुळे व्याधी विकार दूर होऊन आपले शरीर सुदृढ बनते. अन्नपचन सहज होते, त्यामुळे शरीराचे जडत्व दूर होते आणि आपल्या शरीरात कायम तरतरी राहते. रक्तव्यवस्था सुरळीत होते. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुदृढ होते. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे माणसाचे आयुष्य तर दीर्घायुषी होतेच; परंतु माणूस स्वावलंबी सुद्धा बनतो. काम करण्याची स्फूर्ती वाढल्यामुळे मनुष्य कुठलेही काम करू शकतो.त्यामुळे जरी माणसाला पैसा कमावणे गरजेचे आहे, तरी शारीरिक व मानसिक दृष्ट्या माणसाने सुदृढ असलले पाहिजे. आणि जर असे असेल तर त्याची प्रगती होत राहील. म्हणजेच सर्व धनांपेक्षा आरोग्य हे सर्वात श्रेष्ठ धन आहे.