प्र. १. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

उत्तर : सखू आजीचा मृत्यू 

  • लेखकाच्या मनावर खोलवर जखम करून गेला. 
  • आपलं काही हरवल्याची जाणीव झाली. 
  • लेखकाच्या जगण्यातले एक शुभ्र-निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी निर्माण झाली. 

प्र. २. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा. 

उत्तर : 

  • हाड गेली वड्याला बघ माझ्या मळ्याला.
  • मरण लोकाला, सरण दिक्काला 
  • माजं कपाळ, भरलं आभाळ 
  • मरलं माणूस, झिजलं कानूस 
  • म्हातारी नवसाची, भरून उरायची.
  • गाव गरतीला, सपान धरतीला 
  • धरती दुवापली, माती हाराकली

‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे ह्या सर्व विधानांवरून स्पष्ट होते. 

प्र. ३. गुणवैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : सखू आजीमध्ये खालील गुण दिसून येतात 

  • भाषिक ज्ञान 
  • नवीन शिकण्याचा उत्साह 
  • करारीपणा 
  • प्रेमळ

प्र. ४. कंसातील सूचनेनुसार बदल करा.

अ याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा.)

उत्तर : वर्तमानकाळ 

आ आजी, कुठं चाललीस ? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)

उत्तर : सामान्यनाम

इ आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)

उत्तर : आजी माझ्या दूरची नव्हती. 

ई डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव ! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)

उत्तर : पर्वतांच्या कुशीत वसले होते ते गाव !

प्र. ५. स्वमत.

अ सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हाला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.

  • उत्तर : प्रसिद्ध कथाकार ‘राजन गवस’ लिखित ‘सखू आजी’ या प्रस्तुत पाठामध्ये सखु आजीच्या मनातील जुन्या-नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णयक्षमता, माणसांवरचे प्रेम, अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकांनी वर्णन केले आहे. यापैकी सखु आजीचा मला भावणारा एक गुण म्हणजे आजीची बोलण्याची शैली. सखु आजी जेव्हा बोलायची तेव्हा आजीला भाषिक ज्ञान किती आहे?.. हे तिच्या बोलण्यातून दिसत होते. आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे जर तिला कोणी म्हटलं,” म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मारायला?” तर ती लगेच म्हणायची, 

मरण लोकाला, सरण दिक्काला 

माजं कपाळ, भरलं आभाळ 

मरलं माणूस, झिजलं कानूस 

म्हातारी नवसाची, भरून उरायची.

हे सर्व ती जुळवून बोलायची असं नव्हतं पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून हे बाहेर पडायचं. सखु आजीच्या बोलण्याचा प्रभाव सर्वांवरच पडत होता. 

 सखू आजीचा प्रेमळपणा तिच्या स्वभावातून खूप प्रकर्षाने दिसून येतो. आजी सर्व लहान मुलांना गोळा करून त्यांना देवाच्या गोष्टी सांगायची. शाळेत जाताना किंवा शाळेतून आल्यावर रोज सखूआजी लहान मुलांना गोष्ट सांगायची. गावात कुणाचेही बारसे असो, लग्न असो, इतकंच काय तर कुणाचं मयत झालेलं असो, सखु आजी नेहमीच हजार असे. गावातल्या चोपडा यांचा मुलगा पहिल्यांदा पोलीस झाला तेव्हा सखु आजीने गावातील सर्व बायका गोळा करून त्याला ओवाळले, दही साखर खाऊ घातले. सखु आजी सगळ्या गावातील लहान थोरांमध्ये आपलं घर शोधायचे सखु आजी जेव्हा मरण पावली तेव्हा लहान मुलांपासून म्हातारा पोतरांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि गाव पोरक झाल्यासारखं वाटलं या सर्व गोष्टीतून सखूआजीचा प्रेमळपणा दिसतो. 

आ खालील मुद्द्यांना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

  १ करारीपणा 

उत्तर : सखु आजीच्या मनात जे येत होतं ते ती सर्वांसमोर बेधडकपणे मांडत होती. एकदा गावात लक्ष्मीच्या जत्रेच्या वेळेस चाकबंदी झाली. त्यावेळी गावातील वस्तू घेऊन बाहेर जायचे नाही असा नियम होता; परंतु सातबा घोरपड्याच्या मुलाने हा नियम मोडला व गाव बैठकीमध्ये पंचांनी असा निर्णय मांडला की, त्या मुलाला दंड करायचा. सर्व गावाने त्याला होकारही दर्शवला. तितक्यात सखू आजी उठून म्हणाली, “पोरग मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापतय व्हय गा ?” आजीच्या या वाक्यावर कोणीच काहीच बोलले नाही व सर्व आपापल्या घरी निघून गेले. सर्वजण आजीच्या करारीपणाला घाबरत होते. 

२ आजीचा गोतावळा

उत्तर : प्रसिद्ध लेखक ‘राजन गवस’ लिखित ‘सखूआजी’ या पाठामध्ये आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निरीक्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकांनी वर्णन केले आहे. सखु आजी ९० वर्षांची होती. तिच्या हातात काठी असायची, तिचं शरीर खूप थकलेलं होतं, ती कमरेतून वाकून चालायची, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता, पण तरीसुद्धा प्रत्येक जण तिच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करायचा. आणि सखू आजी सुद्धा प्रत्येकाबरोबर बोलायची. सखूआजी बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडायचे, जणू काही सुखाची एक कविताच बोलायची. तिच्या बोलण्यातून तीला प्रचंड भाषिक ज्ञान आहे हे दिसून यायचं. सखूआजी जरी स्वतः शिकली नव्हती तरी ती गावातील सर्व मुलांना गोळा करुन देवाच्या गोष्टी सांगायची. गावातील अडाणी आयाबायांना गोळा करून सखु आजी लेखकाकडे गेली व लेखकाला प्रौढ साक्षरतेचे वर्ग घेण्यास सांगितले. त्या वर्गात सखूआजी स्वतः तर शिकलीच; परंतु तिने दुसऱ्या बायकांना सुद्धा शिकवले. शिवाय गावच्या सरपंचांना सुद्धा तिने सही पुरते साक्षर केले. गावातल्या प्रत्येक लहान थोरांमध्ये तिला आपलं घर दिसायचं. गाव म्हणजे आजीचा गोतावळा जणू. 

प्र. ६. अभिव्यक्ती.

अ ‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

उत्तर : पूर्वी गावोगावी, घरोघरी सर्वांना आजी असायची. आजी नावाच्या व्यक्तिमत्त्वाला खूप महत्त्व होते. घरातला सगळ्या लहान-मोठ्यांना आजी भरभरुन प्रेम करायची. सर्वांना आपापल्या आजीबद्दल आपुलकी होती. कुणाच्याही बारशाला, लग्नाला किंवा अगदी मैताला जे आजी सांगेल तेच सर्वजण ऐकायचे. गावच्या सर्व निर्णयांमध्ये म्हाताऱ्या माणसांचे खूप महत्वाचे स्थान होते. सणासमारंभामध्ये आजी जे सांगेल त्यानुसारच सर्वजण वागायचे; परंतु सध्याच्या जगामध्ये जुन्या गोष्टी जशा दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, तसेच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे चे स्थान दुर्मिळ होत चालले आहे.

 विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नातवंडांना आजी आजोबांबरोबर राहायला मिळत नाही. आजी आजोबांचे संस्कार मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूप उपयोगी असतात. वेळेनुसार लोकांचे विचारही बदललेले आहेत. त्यामुळे आजींच्या जुन्या विचारांना आता कोणी जास्त महत्व देत नाही. साधारण सर्दी खोकल्यावर आजीच्या घरगुती उपायाने इलाज केला जात होता; परंतु आता त्यासाठी सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणे जास्त महत्त्वाचे लोकांना वाटते. आजीने गोष्ट सांगावी व नातवंडांनी गोष्ट ऐकता ऐकत झोपावे हा घरोघरी नित्य नियम होता; परंतु आता मुलांनाही मोबाईल शिवाय झोप येत नाही. त्यामुळे बदलत्या गाव गाड्यात आजीला जागाच उरली नाही. 

आ तुम्हांला समजलेल्या ‘सखू आजीचे’ व्यक्तिचित्र रेखाटा.

उत्तर : प्रसिद्ध लेखक ‘राजन गवस’ लिखित ‘सखूआजी’ या पाठामध्ये आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निरीक्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकांनी वर्णन केले आहे. सखु आजी ९० वर्षांची होती. तिच्या हातात काठी असायची, तिचं शरीर खूप थकलेलं होतं, ती कमरेतून वाकून चालायची, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता, पण तरीसुद्धा प्रत्येक जण तिच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करायचा. आणि सखू आजी सुद्धा प्रत्येकाबरोबर बोलायची. सखूआजी बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडायचे, जणू काही सुखाची एक कविताच बोलायची. तिच्या बोलण्यातून तीला प्रचंड भाषिक ज्ञान आहे हे दिसून यायचं. सखूआजी जरी स्वतः शिकली नव्हती तरी ती गावातील सर्व मुलांना गोळा करुन देवाच्या गोष्टी सांगायची. गावातील अडाणी आयाबायांना गोळा करून सखु आजी लेखकाकडे गेली व लेखकाला प्रौढ साक्षरतेचे वर्ग घेण्यास सांगितले. त्या वर्गात सखूआजी स्वतः तर शिकलीच; परंतु तिने दुसऱ्या बायकांना सुद्धा शिकवले. शिवाय गावच्या सरपंचांना सुद्धा तिने सही पुरते साक्षर केले. गावातल्या प्रत्येक लहान थोरांमध्ये तिला आपलं घर दिसायचं. गाव म्हणजे आजीचा गोतावळा जणू. सखूआजीच्या या सर्व गोष्टींमुळे तिच्याविषयी सगळ्यांमध्ये मनामध्ये आदर होता. त्यामुळे जेव्हा सखूआजी मरण पावली तेव्हा संपूर्ण गाव पोरकं झाल्यासारखं वाटलं. सर्व  लहान पोरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांच्या डोळ्यातून पाणी आलं.

इ सखूआजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.

उत्तर : सखु आजीप्रमाणे माझी आजी सुद्धा प्रतिभावंत आहे. तिचे चे नाव यशोदाबाई आहे. गावामध्ये सर्व लहान थोरांमध्ये ती प्रिय आहे. सर्व समारंभामध्ये माझी आजी पुढाकार घेते व सर्वांना मार्गदर्शन करते. 

वयाच्या सत्तरी मध्ये सुद्धा ती गावांमध्ये सायकलवर फिरते. आम्ही सर्व भावंडे जेव्हा एकत्र येतो तेव्हा आजी आमच्यासाठी गोष्टी रुपी खजिनाच तयार ठेवते. रोज झोपताना ती आम्हाला एक गोष्ट सांगते. आमच्या घरातच काय तर पूर्ण गावातही आजीच्या निर्णयाला सर्वजण पाठिंबा देतात. गावामध्ये तिचा खूप आदर आहे. 

 गावात ती एकटी राहते त्यामुळे सर्व गावच तिचा गोतावळा आहे. आम्ही तिच्या संपर्कात राहावे म्हणून रोज आम्ही तिच्याबरोबर फोनवर बोलते. बदलत्या काळानुसार तिनेही आपले विचार बदललेले आहेत. मुलांबरोबर मुलींचे देखील उच्च शिक्षण व्हावे यामध्ये ती पुढाकार घेते. गावात प्रत्येक घरामध्ये आजीच्या मताला खूप प्राधान्य दिले जाते. सखूआजीप्रमाणे माझ्या आजीला सुद्धा नवनवीन गोष्ट शिकून घेण्या घेण्याचा खूप उत्साह आहे. आम्ही जेव्हा पण आजीला भेटायला जातो तेव्हा आजी आमच्याकडं मोबाईल मधल्या नवीन नवीन गोष्टी शिकून घेते.

भाषाभ्यास

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सामाजिक शब्द विग्रह

१ यथामती  

मतीप्रमाणे 

२ हरसाल 

प्रत्येक वर्षी

३ गावोगाव

 प्रत्येक गावी

४ आमरण

 मरेपर्यंत 

५ यथाशक्ती

 शक्ती प्रमाणे

बाजूच्या चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.

अ.क्र.सामाजिक शब्दविग्रहसमासाचे नाव
घडोघडी प्रत्येक घडी अव्ययीभाव समास 
बरेवाईटबरे किंवा वाईटवैकल्पिक द्वंद्व
पापपुण्यपाप किवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व
प्रतिक्षणप्रत्येक क्षणीअव्ययीभाव समास
५ मीठभाकरी मीठ, भाकरी व इतर पदार्थ समाहार द्वंद्व 
६ आजन्मजन्मापासून मरेपर्यंत अव्ययीभाव समास
७ खरेखोटे खरे किवा खोटे वैकल्पिक द्वंद्व