प्र. १. कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते?

  1. पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण………

उत्तर: जसा पावसाच्या सरींमुळे माती एकरूप होते तसेच समाजातील भेदाभेद मिटून जातील

  1. भुलावी तहान विसरावी भूक, कारण………..

उत्तर : त्यामुळे नवनिर्मिती करण्याची इच्छा होईल व भारतभूमीचे नाव उंचावेल

प्र. २. खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टीपरिणाम
(१) वीज चमकणे.
(२) वारा घुमणे.
गोष्टीपरिणाम
(१) वीज चमकणे.रक्तात भिनून स्नायू पेटून उठावेत
(२) वारा घुमणे.युवक भारावून जावे

प्र. ३. खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट‘ब’ गट
(१)वीज रक्तात भिनावी(अ)सर्वत्र भारत भूमी चमकावी
(२)मातीत माती एक व्हावी(आ)समाजातील भेदभाव नष्ट व्हावे
(३)नवनिर्माणाची चाहूल लागावी(इ)मातीने भेदभाव विसरावा
(४)पुसून टाकीत भेदभाव(ई).माणसांत उत्साह निर्माण व्हावा
(५)उजळावी भूमी दिगंतात(उ)नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी

उत्तर : 

‘अ’ गट‘ब’ गट
(१)वीज रक्तात भिनावी(अ)माणसांत उत्साह निर्माण व्हावा
(२)मातीत माती एक व्हावी(आ)मातीने भेदभाव विसरावा
(३)नवनिर्माणाची चाहूल लागावी(इ)नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी
(४)पुसून टाकीत भेदभाव(ई)समाजातील भेदभाव नष्ट व्हावे
(५)उजळावी भूमी दिगंतात(उ)सर्वत्र भारत भूमी चमकावी

प्र. ४. भावार्थाधारित.

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.

उत्तर : प्रसिद्ध कवयित्री ‘प्रतिमा इंगोले’ यांच्या “पुन्हा एकदा” या कवितेमध्ये नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भाव स्थितीचे वर्णन कवियत्रीने केले आहे. 

“मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद” ह्या ओळीमध्ये कवियत्रीला पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळल्यानंतर जशी माती एकरूप होते, तसेच समाजातील सारे भेदभाव मिटून जावेत व सर्व जाती पंथ धर्माचे लोक एक व्हावेत असे वाटते. समाजामध्ये गरीब-श्रीमंत, उच्च-नीच किंवा स्त्री-पुरुष असे जे विविध प्रकारचे भेद आहेत ते नष्ट व्हावेत व नव्या समाजाची निर्मिती व्हावी असे कवयित्रीला वाटते.

प्र. ५. अभिव्यक्ती.

  1. आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.

उत्तर : प्रसिद्ध कवयित्री ‘प्रतिमा इंगोले’ यांच्या “पुन्हा एकदा” या कवितेमध्ये नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भाव स्थितीचे वर्णन कवियत्रीने केले आहे. 

आपल्या देशात आज अशांतीचे वातावरण आहे, कारण आपल्या देशात भ्रष्टाचार अन्याय स्त्री-शोषण, बाल-शोषण असे अनेक वाईट प्रकार घडत आहेत. आपल्या देशात शांतता येण्यासाठी नागरिकांना पुन्हा एकदा एकत्र येऊन जातिभेद, धर्मभेद व दहशतवादाविरुद्ध एकजूट दाखवावी लागेल. सर्वांनी प्रामाणिक राहून देशसेवा केली पाहिजे. स्वतः भ्रष्टाचार न करता इतरांनाही न करु देणे हा गुण लोकांनी अंगीकारला पाहिजे. सर्वांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावले पाहिजे. आपल्या प्रश्नांसाठी व हक्कांसाठी सर्वांनी शांततेच्या मार्गाने लढले पाहिजे. देश घडवण्याच्या प्रक्रियेत देशाचा नागरिक सक्रिय होणे हे खूप महत्त्वाचे आहे, तरच आपल्या देशातील अशांतता जाऊन शांतता निर्माण होईल.

  1. कवितेत तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.

उत्तर : प्रसिद्ध कवयित्री ‘प्रतिमा इंगोले’ यांनी “पुन्हा एकदा” या कवितेमध्ये नवनिर्माणाचा ध्यास घेणाऱ्या एका मनाची भाव स्थिती चे वर्णन केले आहे. कवयित्रीला वाटते की देशामध्ये पुन्हा एकदा क्रांती घडवून यावी, म्हणजेच आकाशातील विजेसारखा सळसळता उत्साह माणसांमध्ये संचारावा व नवनिर्माणाचे कार्य माणसाने हाती घ्यावे. पावसाच्या सरी बेभान होऊन जमिनीवर कोसळाव्या व त्यात माती जशी एकरूप होते तसेच लोकांनी समाजातील मतभेद विसरुन एकत्र यावे. बदलाचे वारे जोरात वाहून युवक वर्ग भारावून गेला पाहिजे व त्यांनी आपली तहानभूक विसरुन नवनिर्माणाचा ध्यास घेतला पाहिजे. या नवीन विचारांनी आपली भारतभूमी उजळून निघेल व त्यामुळे आपल्या भारत भूमीचे नाव किंवा कीर्ती सर्व जगभरात पसरावी असे कवयित्रीला वाटते. 

अपठित गद्य आकलन

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

प्र. १. चौकटी पूर्ण करा.

(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचे प्रतीक – प्रकाश, सत्य व साधेपणा 

(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचे प्रतीक –  त्याग व नम्रता 

(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचे प्रतीक – हरितश्यामल भूमाता 

प्र. २. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.

उत्तर : आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला तिरंगा लाल किल्ल्यावर झळकला. तिरंग्यामध्ये केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग आहेत. मध्यभागी अशोक चक्र आहे. केशरी रंग हा त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे. आपल्या देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले त्यांच्या त्यागाचे केशरी रंग स्मरण करतो. तर पांढरा रंग हा प्रकाश, सत्य व साधेपणाचा प्रतीक आहे. या रंगामुळे शांतता व पावित्त्र्याचे दर्शन घडते, तर हिरवा रंग हा हिरव्यागार व सश्यशामल भूमातेचे प्रतीक आहे. हा रंग धन-धान्यांची समृद्धी व भरभराट दर्शवितो. तसेच अशोक चक्र हे धर्माची, सदगुणांची खूण आहे. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमेव राहू असा त्याचा अर्थ आहे. तसेच चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते की, गतिमान रहा.