(१) उत्तरे लिहा.

(अ) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख

उत्तर. पुलकितशाल

(आ) २००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

उत्तर. रा. ग. जाधव

(इ) पाठात उल्लेख असणारी नदी

उत्तर. कृष्णा नदी

(ई) सभासंमेलने गाजवणारे कवी

उत्तर. नारायण सुर्वे

(२) शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा.

शालीचे उपयोग

सन्मान करणे, गरजवंतास देणे, भिक्षेकऱ्यास देणे, अंगावर मिरवणे, अभागी लोकांना देणे.

(३) खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

(अ) एका बाईचे बाळ कडाक्याचा थंडीने कुडकुडत होते.

उत्तर. लेखकाने सुटकेस मधून पुलकित शाल काढली व खिडकीतून ती शाल व पाच पन्नास रुपयाच्या नोटा दिल्या.

(आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पहिले.

उत्तर. लेखक दोन शाली घेऊन आले व अशक्त भिक्षेकऱ्यास त्या शाली दिल्या.

(४) कारणे शोधून लिहा.

(अ) एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती,

उत्तर. कारण लेखकाला परोपकार केल्याचे सुख लाभले.

(आ) शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही

उत्तर. कारण सुर्वे मुळातच शालीन होते.

(ई) लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते

उत्तर. कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका मोठा असतो.

५. आकृती पूर्ण करा.

लेखकांनी भूषवलेले पदे.

विश्वकोशाचे – अध्यक्षपद

मराठी साहित्य संमेलनाचे – अध्यक्षपद

(६) खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

(अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.

उत्तर. संवेदनशीलता

(आ) खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!

उत्तर. वास्तवाचे भान

(इ) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.

उत्तर. उदारता

(७) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

(अ) जवळपास

उत्तर. जवस, जव, जळ, पाळ, जपा, पास

(आ) उलटतपासणी

उत्तर. उलट, तपासणी, पास, तट, पाल

(८) अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे.

उत्तर. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे.

(आ) खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या.

उत्तर. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या.

(इ) मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले.

उत्तर. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या  मित्राकडे ठेवले.

(९) ‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

१०) शालींपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याचप्रमाणे ‘ता’, ‘त्व’,’आळू’, आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.

उत्तर.

तात्वआळूपणा
१. सुंदरताव्यक्तित्वदयाळूलठ्ठपणा
२. नम्रताकर्तृत्वकष्टाळूबावळटपणा
३. मधुरतादातृत्वमायाळूविसरभोळेपणा
४. प्रसन्नताममत्वकनवाळूअधाशीपणा

(११) अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) लेखक सुंदर लेखन करतात.

उत्तर. लेखिका सुंदर लेखन करतात.

(आ) तो मुलगा गरिबांना मदत करतो.

उत्तर. ती मुलगी गरिबांना मदत करते.

(१२) स्वमत

(अ) “शाल व शालीनता” यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर. आपल्या भारत देशात शालीला गौरवाचे प्रतीक मानले जाते. पण शाल हि फक्त सन्मान करण्याची गोष्ट नाही तर ती ज्याला सन्मान म्हणून मिळते त्याने त्या शालीचा योग्य वापर केला पाहिजे. आता शालीनता म्हणजे नम्रता. शालीनता हि मुळातच असावी लागते. एखाद्या माणसाचा सारखा शालीने सन्मान होत असेल तर शालीनता गमावण्याचा धोका असतो.

(आ) ‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर. लेखक जेव्हा ओंकारेश्वराच्या पुलावर गेले होते. तेव्हा त्यांनी एका म्हाताऱ्या भिक्षेकऱ्याला पहिले. तो भिक्षेकरी थंडीने कुडकुडत होता. म्ह्णून लेखकाने त्याला दुसऱ्या दिवशी दोन शाली दिल्या. पण त्या भिक्षेकऱ्याने त्या शाली अंगावर न घेता त्याने त्या शाली विकून टाकल्या व दोन तीन दिवस पोटभर जेवला. “शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट” म्हणजे जर त्या भिक्षेकऱ्याने शाल अंगावर घेतली असती तर त्याला कोणी भीक दिली नसती व तो असाच उपाशी राहून वारला असता. म्हणून भुकेल्याला अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात.

(ई) लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.उत्तर. लेखकाच्या भावना शालीशी निगडित आहेत तसेच माझा भावना हरिपाठाशी निगडित आहेत. आता तुम्ही म्हणाल पुस्तकाशी भावना कशा निगडित राहतील? तर तसे नाही..हे पुस्तक मला माझा पणजी आज्जीने हरिपाठाचे वेळेस दिले होते. जेव्हा मी बालवाडीत होते. त्यावेळी घरी हरिपाठ असला कि सगळे पटापट हरिपाठ बोलायचे आणि मला येत नसल्यामुळे मी रडत बसायचे. म्हणून आजीने मला ते पुस्तक दिले. या पुस्तकामुळे नुसता हरिपाठाचे नाही झाला तर जीवनात आपण कसे वागावे, कसे राहावे हे शिकवले.