प्र. १. आकृती पूर्ण करा.

  • रेखामावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये

उत्तर: मळकट व चिरण्या पडलेले

  • पावडेकाकांच्या पावलांची वैशिष्ट्ये

उत्तर: गोजिरी गुलाबासारखे व लोण्यागत

प्र. २. कारणे लिहा.

अ) स्नेहल त्रासली, कारण…..

उत्तर: स्नेहल त्रासली कारण, रेखामावशी जेव्हा लादी पुसत होत्या तेव्हा पुसून झालेल्या लादीवरच त्यांच्या मळकट पायाचे ठसे उमटत होते व स्वच्छतेची आवड असलेल्या स्नेहलला ते आवडले नाही. 

आ) पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण…

उत्तर: पावडेकाकांचा चेहरा पडला कारण, सुमितच्या अॅप मध्ये पावडेकाकांची पावले, ‘डर्टीएस्ट फूटप्रिन्टस, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्टस’ अशी दिसली.

(इ) रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत, कारण…

उत्तर: रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण, त्यांच्या रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. 

(ई) अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण….

उत्तर: अभिषेकाचे मामा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट कारण, त्यामुळे आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवता येईल व ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टळेल.

प्र. ३. उत्तर लिहा.

(अ) स्नेहलने केलेला निश्चय –

उत्तर: कॉलेजला ये-जा करण्यासाठी सायकल वापरणार.

(आ) अभिषेकाने केलेला निश्चय –

उत्तर: कॉलेजला ये-जा करण्यासाठी बसचा वापर करणार.

प्र. ४. पाठातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती – अभिषेक

स्वभाव वैशिष्ट्ये – पर्यावरण प्रेमी, जागरूक

व्यक्ती – सुमित

स्वभाव वैशिष्ट्ये – टेक्नोलॉजीची आवड असणारा व पर्यावरण प्रेमी 

व्यक्ती – स्नेहल

स्वभाव वैशिष्ट्ये – स्वच्छतेची आवड असणारी

व्यक्ती – पावडेकाका

स्वभाव वैशिष्ट्ये – पर्यावरणाच्या बाबतीत उदासीन असणारे

व्यक्ती – रेखामावशी

स्वभाव वैशिष्ट्ये – मेहनती व पर्यावरण संवर्धनास मदत करणाऱ्या

प्र. ५. खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

  • रेखमावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.

उत्तर: उपमा अलंकार

  • पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.

उत्तर: उपमा अलंकार

प्र. ६. खालील शब्दांचे प्रचलित मराठीत अर्थ लिहा.

अ) व्हर्चुअल रिअलिटी – आभासी वास्तविकता

आ)   टेक्नोसॅव्ही – तंत्रज्ञान जाणकार

प्र. ७.  खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा.

वाक्य – “मावशी, तुम्ही राहता कुठे?”

उत्तर:

विरामचिन्हे नावे

“ “             दुहेरी अवतरण चिन्ह

,                स्वल्पविराम

?                प्रश्नार्थक चिन्ह

प्र. ८. खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.

१) स्नेहल = नाम

२) तिचे = सर्वनाम

३) चंदेरी = विशेषण

४) करणे = क्रियापद

(९) खालील तक्ता पूर्ण करा.

एकवचन    अनेकवचन

शहर         शहरे

नदी           नद्या

पाऊल       पावले

डोंगर         डोंगर

प्र. १०. स्वमत.

अ) ‘आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: प्रसिद्ध कवी, कथाकार व नाटककार डॉ. प्रदीप आवटे लिखित फूटप्रिन्टस या पाठात लेखकाने पर्यावरण संवर्धनाचे महत्व विशद केले आहे. वातावरणात ग्लोबल वॉर्मिंगचे संकट वाढले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाने खूप प्रगती केली परंतु; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. नैसर्गिक गोष्टींचे खूप मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. प्रत्येक व्यक्ती दळणवळणासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करताना दिसतो. या वाहनांमुळे वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात कार्बन मिसळत आहे. वाहनांच्या व फटाक्यांच्या धूरामुळे हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. वृक्षतोड करून मोठमोठ्या इमारती उभारल्या जात आहेत. झाडे नष्ट झाल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे फरशीवरील धुळीचे ठसे आपण पुसू शकतो परंतु; वातावरणातील आपण केलेले हे प्रदूषण सहजासहजी आपण पुसू शकत नाही, असे लेखकाला इथे सांगायचे आहे.

आ)   ‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.

उत्तर: ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणीमातेला वाचवण्यासाठी वृक्षसंवर्धनाबरोबरच, वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक व्यवस्थेचा अधिकाअधिक वापर करावा, त्यासाठी आपण जीवनशैली बदलावी असा संदेश लेखकाने प्रस्तुत पाठात दिले आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन झाडांचे सुद्धा संवर्धन केले पाहिजे. जवळच्या अंतरावर ये-जा करण्यासाठी सायकलचा वापर केला पाहिजे. मोठमोठ्या कारखान्यातून बाहेर पडणारा धूर कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. जल किंवा वायू प्रदूषण होऊ नये म्हणून सर्वांनी वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे. सणावरांना फटाके फोडण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे जेणेकरून येण्याऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा स्वच्छ हवा मिळेल. वातानुकूलित यंत्रांचा वापर कमीत कमी केला पाहिजे.