प्र. १. खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.

१ लेखकाची माध्यमिक शाळा – गिरगाव येथील युनियन हायस्कूल

२ लेखकाला घडवणारे शिक्षक – भावे सर, जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला

३ लेखकाचे जन्मगाव – माशेल (दक्षिण गोवा)

४ ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती – लेखकाची आई व मामा

५ मुंबईतील घराचे नाव – मालती निवास

प्र. २. आकृती पूर्ण करा.

अ) युनियन हायस्कुलमधील शिक्षकांची वैशिष्ट्ये –

उत्तर: सेवाभावी वृत्ती, स्वत:ला झोकून देऊन शिकवणे व निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करणे.

आ) लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्त्व विशेष –

उत्तर: खूप श्रम करणारी, लेखकाच्या शिक्षणासाठी धडपड करणारी, दारिद्रयाशी संघर्ष करणारी

प्र. ३.  कारणे लिहा.

  • लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण….

उत्तर: लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली कारण, लेखकाला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाले व त्यामुळे त्यांचा अभ्यासाचा व जीवनाचा पाया पक्का झाला.  

आ) लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण…..

उत्तर: लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही कारण, तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम मिळत होते.

इ) लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण….

उत्तर: लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारण, त्या शाळेची फी जमा होईपर्यंत तिथले प्रवेश बंद झाले होते.

प्र. ४. कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.

अ) आपण सगळ्यांनी…….मदत केली पाहिजे. (आई)

उत्तर: आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.

आ) आमच्या बाईंनी प्रमुख …….. आभार मानले. (पाहुणे)

उत्तर: आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी ………. रुजू झाला. (नोकरी)

उत्तर: शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीवर रुजू झाला.

प्र. ५. ‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’

 प्रस्तुत वाक्यातील

  • अलंकार – उपमा अलंकार
  • उपमेय – पुसटशा आठवणी
  • उपमान – वाऱ्याच्या लहरी

प्र. ६. स्वमत

  • ‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

उत्तर: ‘डॉ. रघुनाथ माशेलकर’ हे आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. ‘ऊर्जाशक्तीचा जागर’ या पाठात लेखकाने त्यांच्या विदयार्थीदशेतील आठवणी सांगितल्या आहेत. भावे सरांनी लेखकाला एक प्रयोग करुन दाखवला, त्यात भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. यावर भावे सर लेखकाला म्हणाले, ‘माशेलकर तुमची उर्जाशक्ती एकत्र करा. काहीही जाळता येईल.’ यातून लेखकाला एकाग्रतेचा मंत्र मिळाला. आयुष्याच फार मोठं तत्त्वज्ञान लेखकला भावे सरांच्या शिकवणीतून मिळाले.

आ) शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.

उत्तर: ‘ऊर्जाशक्तीचा जागर’ या पाठात ‘डॉ. रघुनाथ माशेलकर’ यांनी त्यांच्या विदयार्थीदशेतील आठवणी सांगितल्या आहेत. लेखकाच्या लहानपणी त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. त्यांच्या आईने दारिद्रयाशी संघर्ष करत त्यांना शिकवले ह्याची जाणीव लेखकाला आहे. त्यामुळे ते किती हळव्या मनाचे आहेत ते समजते. अभ्यासाला पूरक वातावरण नसताना त्यांनी धीर सोडला नाही. अखंड पेन्सिल मिळत नव्हती त्यामुळे हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच ते लिहायचे. यावरून त्यांची अभ्यासासाठी असलेली गोडी, त्यांची जिद्द व चिकाटी दिसून येते. तसेच लेखकाला मिळालेले संस्कार, मार्गदर्शन, आत्मविश्वास व जगण्याचे भान यासाठी ते आई, मामा, सर्व शिक्षक व शाळा यांचे ऋण मानतात. यावरून त्यांची कृतज्ञता दिसून येते.

  इ) डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.

उत्तर: डॉ. माशेलकर यांनी आपल्या जीवनातील यशाचे श्रेय आपल्या आईला दिले आहे. सर्व शिक्षकांचे जरी ते ऋण मानत असतील तरी त्या शिक्षकांशी संपर्क आणला म्हणून आईचे ऋण कसे व्यक्त करावे हे त्यांना समजत नाही. म्हणून ते म्हणतात की आईच सर्वांची प्रथम शिक्षक असते. ते आईला शिक्षकच नाही तर सर्वस्व मानतात. लेखकाच्या आई बद्दल केलेल्या प्रत्येक वाक्यात त्यांची मातृभक्ती ठळकपणे जाणवते.

ई) ‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

उत्तर: मला एक व्यक्ती म्हणून घडवले व चांगल्या वाईट गोष्टींमधील फरक शिकवला ते माझे शिक्षक. आपल्या आयुष्यात आपण नेहमी काही तरी शिकत असतो, हे जरी खार असले तरी सर्वात प्रथम ज्यांनी माझ्या आयुष्याला एक आकार दिला, जाण्याचे भान दिले अशा माझ्या शाळेच्या शिक्षकांचे ऋण मी कधीही विसरणार नाही. आपण वयाने, कर्तुत्वाने किंवा मानाने कितीही मोठे झालो तरी आपल्या शिक्षकांपेक्षा आपण कधीच मोठे होणार नाही. 

“गुरु विना ज्ञान नाही

गुरुच्या ज्ञानाला अंत नाही

गुरुनं जिथं दिलं ज्ञान

तेच खरं तीर्थस्थान”