प्र. १. प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्यप्रकारांची नावे लिहा.

उत्तर: कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवासवर्णन.  

प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.

  • कथेचे प्रकार –

उत्तर: परिकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा.

  • कवितेची वैशिष्ट्ये

उत्तर: छोट आणि आटोपशीर रुप

मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे

अलंकारांनी बाह्य रूप व अंतरंग सजलेले

अर्थपूर्ण व चपलख शब्दरचना

कल्पनांचा सुंदर आविष्कार

  • कवी कुसुमाग्रज

मूळ नाव – वि वा शिरवाडकर

नाटक  – नटसम्राट

प्राप्त पुरस्कार – ज्ञानपीठ

काव्यसंग्रह – विशाखा

प्र. ३. फरक स्पष्ट करा.

चरित्र –

  • एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची गाथा म्हणजे चारित्रलेखन.
  • संघर्षमय, कर्तुत्ववान आणि संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारे असते.
  • लोकांची मने व मते बदलतात.
  • उदाहरणार्थ- बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, रणजित देसाई हे चरित्रकार होते.

आत्मचरित्र –

  • एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या जीवनप्रवासाचे केलेले वर्णन .
  • आत्मचरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन असते.
  • आत्मचरित्र प्रेरणादायी असते.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, डॉ. आमटे हे प्रसिद्ध लेखक आहेत.

प्र. ४. खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करुन प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

  • रस्ते – रस्ता

वाक्य – तो रस्ता खूप वळणदार आहे.

  • वेळा – वेळ

वाक्य – दिलेली वेळ नेहमी पाळावी.

  • भिंती – भिंत

वाक्य – वादळात आमच्या घराची भिंत कोसळली. 

  • विहिरी – विहीर

वाक्य – गावची विहीर खूप खोल आहे.

  • घड्याळे – घडयाळ

वाक्य – आईने मला वाढदिवसाला एक घडयाळ घेतले.

  • माणसे – माणूस

वाक्य – गाड्यांची एवढी गर्दी झाली की एकही माणूस रस्ता ओलांडून जाऊ शकला नाही.

प्र. ५. खालील शब्दांना पर हा एकाच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.

उत्तर: परप्रांत , परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र

प्र. ६. खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.

यथामती – (मतीप्रमाणे) – अव्ययीभाव समास

प्रतिदिन – (दररोज) – अव्ययीभाव समास

आईवडील – (आई आणि वडील) – इतरेतर द्वंद्व समास

चारपाच – (चार किंवा पाच) – वैकल्पिक समास

त्रिभुवन – (तीन भूजा) – द्विगू समास

केरकचरा – (केर, कचरा व इतर) – समाहार द्वंद्व समास

भाजीपाला – (भाजी, पाला व इतर) – समाहार द्वंद्व समास

चहापाणी – (चहा, पाणी व इतर) – समाहार द्वंद्व समास

आजन्म – (जिवंत असेपर्यंत) – अव्ययीभाव समास

गैरशिस्त – (चुकीची शिस्त) – अव्ययीभाव समास

विटीदांडू – (विटी आणि दांडू) – इतरेतर द्वंद्व समास

पापपुण्य – (पापा किंवा पुण्य) – वैकल्पिक समास

स्त्रीपुरुष – (स्त्री आणि पुरुष) – इतरेतर द्वंद्व समास

प्र. ७. स्वमत.

  • पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे लिहा.

उत्तर: पुस्तकाशी केलेली मैत्री ही निखळ व निस्वार्थ असते. शिवाय ही मैत्री अतूट असते. चित्र व शब्दांच्या माध्यमातून ते आपल्या बरोबर बोलतात. आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवतात. आपल्याला चांगले शिक्षण व चांगले विचार देतात. आपण त्यांच्या बरोबर कितीही वेळ घालवला तरी त्याचे तोटे अजिबात नाही. पुस्तके आपल्यावर कधीही रागावत नाहीत किंवा आपल्याशी कधी भांडत नाहीत. पुस्तकं कुणाकडून काहीच अपेक्षा ठेवत नाहीत.   

  • तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: मराठी साहित्य विविध प्रकारे लेखकांनी शब्दबद्ध केले आहे. कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवासवर्णन हे साहित्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हयापैकी मला आवडणारा सर्वात जास्त प्रकार म्हणजे नाटक. व्यावसायिक, सामाजिक, एकपात्री, लहान मुलांची नाटकेअसे वेगवेगळे प्रकार हयात आहेत. विविध पात्रे असलेले एकपात्री नाटक हे त्यात मला सर्वात जास्त आवडते. वाचताना किंवा पाहताना आपण सुद्धा त्या सर्व पात्रांबरोबर तो प्रसंग जगत आहोत असे वाटते.

  • उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर: उत्तम लेखक होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे शब्द संपत्ती. जर भाषेतील शब्द, तिचे व्याकरण ह्या सर्व गोष्टी लेखकाला माहीत नसतील, तर तो उत्तम लेखन करू शकणार नाही. जर वाचनाची सवय असेल तर विचारांना चालना मिळते. सर्व गोष्टी लेखनासाठी खूप सोप्या होतात. समाजातील विविध चाली-रिती, घडामोडी ह्यांचा अभ्यास केला तर लेखन उत्तम होते व लेखकाला स्वत:ची लेखनशैली ठरवता येते. तसेच उत्तम शब्द वापरल्याने वाचक सुद्धा आनंदी होतो.