प्र. १ कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
डोंगरावर बिया उधळणे –
उत्तर: १ डोंगरावर बिया उधळणे.
२ बिया मातीत रुजून झाडे वाढणे.
३ भरगच्च रान तयार होणे.
४ भरपूर झाडांमुळे, रानामुळे चांगला पाऊस पडणे.
- आकृती पूर्ण करा.
काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य
उत्तर: मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देणे.
डोंगरावर बिया उधळून त्याचे रान तयार करणे.
देशी झाडे रुजवणे.
प्र. २. चौकटी पूर्ण करा.
- जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – फुलफुलांचे दाट ताटवे
- कावयित्रीच्या मते जपायची गोष्ट – सृष्टी
प्र. ३. कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
- आभाळाचे छत्र ……
उत्तर: आपल्या पृथ्वीवर आकाशाचे छत आहे व ह्या छताखाली आपण सर्व सुरक्षित व आनंदात आहोत.
- गर्भरेशमी सळसळ……..
उत्तर: पाऊस आल्यानंतर हिरवी झाडे, त्यांची पाने यांचा सळसळ आवाज येतो, त्याप्रमाणे पाऊस आल्यानंतर माणसांच्या मनातही आनंदी व कोमल भावना जागृत होतात.
प्र. ४. कृती पूर्ण करा.
- कष्ट करणाऱ्यांना मदत करु, या आशयाची ओळ शोधा.
उत्तर: मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी……
- दौलत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर: यंत्रांच्या संगतीने माणसांना काय मिळेल?
- कवितेतील यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा.
उत्तर: दृष्टी-सृष्टी, पुष्टी-वृष्टी, कष्टी-तुष्टी-गोष्टी
प्र. ५. काव्यसौंदर्य.
- खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’
उत्तर: प्रसिद्ध कवयित्री ‘अंजली कुलकर्णी’ लिखित ‘रंग मजेचे रंग उद्याचे’ ह्या कवितेतील वरील ओळी आहेत. जगतिकीकरणाच्या ह्या काळात संगणकयुग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये, असे कवयित्री येथे सांगू पाहाते. निसर्गसौंदर्याच्या विलोभनीय अविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल असा दृष्टिकोन कावयित्रीने ह्या कवितेत मांडला आहे. पाऊस आल्यानंतर हिरवी झाडे, त्यांची पाने यांचा सळसळ आवाज येतो, त्याप्रमाणे पाऊस आल्यानंतर माणसांच्या मनातही आनंदी व कोमल भावना जागृत होतात. हिरवी सृष्टी ही समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे, त्यामुळे सृष्टीचे संवर्धन कसे करायचे हे जगाला सांगू असे कवयित्री म्हणते.
- पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे लागेल असे कावयित्रीला वाटते?
उत्तर: प्रसिद्ध कवयित्री ‘अंजली कुलकर्णी’ लिखित ‘रंग मजेचे रंग उद्याचे’ ह्या कवितेतील वरील ओळी आहेत. जगतिकीकरणाच्या ह्या काळात संगणकयुग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये, असे कवयित्री येथे सांगू पाहाते. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही, असे ती म्हणते. काळ्या आईला म्हणजे मातीची आपण सेवा केली पाहिजे, म्हणजे मातीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण पाठबळ दिले पाहिजे. डोंगरावर बिया उधळून त्यांतून दाट झाडी वाढवली पाहिजे. यामुळे भरपूर पर्जन्यवृष्टी होईल व ही सृष्टी कायम हिरवीगार राहील. त्यामुळे वातावरणात योग्य प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होईल व प्रदूषण कमी होईल, व आपल्या पृथ्वीचे संवर्धन होईल.
- वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तर: जगतिकीकरणाच्या ह्या काळात संगणकयुग अवतरलेले आहे व हिरवी सृष्टी हळूहळू नष्ट होत चालली आहे. त्यामुळे प्रदूषण वाढून माणसांचे आजार सुद्धा वाढले आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी आपण वसुंधरेची म्हणजेच आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे.
नुसतेच झाडे लावा बोलून चालणार नाही तर त्या लावलेल्या झाडांचे योग्य संवर्धन सुद्धा झाले पाहिजे. म्हणजे त्या झाडांना नियमित पाणी व खत देऊन त्यांची जोपासना केली पाहिजे. वृक्षतोड थांबली पाहिजे किंवा वृक्षतोड करावी लागली तरी तोडलेल्या झाडाच्या जागेवर नवे झाड लावण्याची सक्ती केली पाहिजे. वातावरणातील प्रदूषण कमी केले पाहिजे. त्यासाठी वैयक्तिक वाहने कमी वापरली गेली पाहिजे. कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे ललावली पाहिजे. ओला व सुका कचरा ह्यांचे वर्गीकरण केले पाहिजे. जेणेकरून वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी होईल. प्लॅस्टिक चा वापर टाळून आपण कागद किंवा झाडांच्या पांनाचा वापर केला पाहिजे. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण बदल करुन नक्कीच वसुंधरेचे हिरवेपण जपू शकतो.