प्र. १. कारणे लिहा.

  • लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करुन मुलांचा निरोप घेतला, कारण ……

उत्तर: लेखकाच्या वडिलांची बदली झाली होती. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई-वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.

  • लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली, कारण……

उत्तर: लेखक शिक्षणासाठी आपल्या चुलत्यांकडे राहत असे व लेखकांचे चुलते वाय.एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. तिथे अनेक खेळाडू खेळायला येत असे, म्हणून लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली.

  • ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकला वाटले, कारण……

उत्तर: लेखकाला क्रिकेट खेळायला खूप आवडत असे. त्यातच मैदानावर लवकर खेळायला आलेले खेळाडू त्यांना चेंडू फेकायला लावायचे, त्यामुळे ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकला वाटले.

  • दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण….

उत्तर: लेखकाचे वडील पोलीस खात्यातील त्यांच्या तुटपुंज्या पगारात घरखर्च चालवत होते, त्यामुळे त्यांना खेळणी घेणे शक्य नव्हते म्हणून दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे.

प्र. २. आकृती पूर्ण करा.

  • लेखकाच्या काळजाला भिडलेले दृश्य –

उत्तर: मॅच संपल्यानंतर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी उडणारी झिम्मड.

  • लेखकाच्या बालपणीचा दिनक्रम –

उत्तर:

  • मुलांना जमा करुन विटी-दांडू खेळणे.
  • पतंग उडवणे.
  • कॅम्पमधील कॅनोलमध्ये चोरून पाहणे.
  • कैऱ्या, पेरू पडून त्याचा यथेच्छ आनंद घेणे.
  • घरात जाळण्यासाठी आणलेल्या लाकडांमधून बॅट व स्टंप तयार करणे.
  • जूना बॉल मिळवून क्रिकेट खेळणे.

प्र. ३. ओघतक्ता तयार करा.

  • लाजेने मान खाली
  • आंतर शालेय क्रिकेट मध्ये १०० धावा काढणे
  • शाळेच्या बोर्डावर लेखकाचे नाव झळकणे
  • सर्वांच्या डोळ्यांत कौतुकाचे भाव दिसणे
  • सर्व विदयार्थी व शिक्षकांची लेखकाला शाबासकी मिळणे
  • अभिमानाने मान वर जाणे

प्र. ४. खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानअर्थी शब्द शोदून लिहा.

  • सही – स्वाक्षरी
  • निवास – घर
  • क्रीडा – खेळ
  • प्रशंसा – कौतुक

 

प्र. ५. खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करुन वाक्य पुन्हा लिहा.

(आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)

  • मोठे झालयावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.

उत्तर: मोठे झालयावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची खूणगाठ बांधली.

  • दारात अचानक मामा–मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.

उत्तर: दारात अचानक मामा–मामींना बघून सर्वांचा आनंद गगनात मावेना.

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.

उत्तर: आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उज्ज्वल केले.

  • मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.

उत्तर: मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला.

प्र. ६. स्वमत.

  • लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: जेव्हा लेखकांच्या वडिलांची बदली वडगावला झाली तेव्हा लेखकाला व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी पुण्यात काकांकडे राहावे लागले होते. आई-वडिलांबरोबर राहता यावे म्हणून त्यांनी खूप हट्ट केला; परंतु मुलाने चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. एकदा लेखक शाळा चुकवून मैदानावर क्रिकेटचा सामना बघत बसले होते. लेखकाचे वडील घरी आले व त्यांनी लेखकाला पाहीले व छडया मारत शाळेत नेऊन बसवले. ह्या दोन्ही प्रसंगांवरून लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवते.

  • तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.

उत्तर: ‘चंद्रकांत बोर्डे’ हे भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत. ‘बीज पेरले गेले’ ह्या पाठात चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले गेले हे सांगितले आहे. लेखक त्यांच्या लहानपणी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहत होते. तेथे अनेक सभासद खेळायला येत असे. त्या सर्वांचा खेळाचे निरीक्षण लेखक करत असे. त्यांना सुद्धा खेळाची आवड होती. म्हणून ते शाळा सुटली रे सुटली की मैदानात हजर होत असे. काही सभासद मैदानात लवकर यायचे व लेखकाला चेंडू फेकायला बोलावत असे. क्रिकेट खेळाडू होण्याची खूणगाठ इथेच लेखकाने मनाशी बांधली. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राऊंडवर पाणी मारणे ही कामे लेखक आनंदाने करत होते. अशाप्रकारे लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे.

  • तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.

उत्तर: ‘चंद्रकांत बोर्डे’ हे भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत. ‘बीज पेरले गेले’ ह्या पाठात चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले गेले हे सांगितले आहे. लेखक त्यांच्या लहानपणी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहत होते. तेथे अनेक सभासद खेळायला येत असे. त्या सर्वांचा खेळाचे निरीक्षण लेखक करत असे. मॅच संपल्यानंतर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी लोकांची झिम्मड उडत असे ते पाहून आपणही एक मोठे खेळाडू व्हावे असे लेखकाला वाटू लागले. तेव्हापासून लेखकाने स्वाक्षरी करण्याची तालीम चालू केली शिवाय आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या. म्हणजेच लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज असे उगवले.

  • प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.

उत्तर: कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वात आवश्यक असलेले गुण म्हणजे जिद्द व चिकाटी. मनात जिद्द असेल तर आपल्याला जे पाहिजे ते मिळेपर्यंत त्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे गेले पाहिजे. म्हणजेच निडरवृत्ती असणे ही गरजेचे आहे. वेळप्रसंगी स्वत: मध्ये बदल घडवून आणावे लागतात. त्यामुळे संयम असणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कठोर परिश्रम केल्याशिवाय कोणतेच यश मिळत नाही, त्यामुळे मेहनती असले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द, सहनशीलता, निडरवृत्ती, संयम, एकाग्रता व परिश्रमी असणे गरजेचे आहे.