प्र. १. टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
उत्तर: व्युत्पत्ती कोश शब्दाचे मुळ दाखवतो, म्हणजे तो शब्द कसा तयार झाला किंवा तो मूळ शब्द कसा होता हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे समजते. इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार संदर्भ, उच्चारातील बदल व फरक दाखवतो. काळानुसार शब्दांच्या रूपात व अर्थात काही बदल होत गेले. त्यामुळे त्या शब्दाचा खरा अर्थ आपण व्युत्पत्ती कोशातून काढू शकतो, याशिवाय उच्चारांतील बदल सुद्धा जाणून घेता येतात. वेगवेगळ्या समाजात एकाच गोष्टीला वेगवेगळी नावे असतात, ह्याचे कारण आपण व्युत्पत्ती कोशात शोधू शकतो. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे, हेही दाखवलेले असते.
प्र. २. खालील मुद्दयांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
व्युत्पत्ती कोश – निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसाहाय्य, त्याचे प्रकाशन
उत्तर: १९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते व त्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. व्युत्पत्ती कोशाचे निर्मिती कार्य कृ.पां.कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आले. बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे १९४६ साली ‘मराठी व्युत्पत्ती कोशाचे’ पहिले प्रकाशन झाले.
प्र. ३. पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
शब्द एक अर्थ अनेक
उदा. जल, नीर, तोय – पाणी
उत्तर:
- अरण्य = वन, जंगल, कानन
- आश्चर्य = नवल, अद्भुत गोष्ट, विस्मय
- चंद्र = चंद्रमा, शशी, रजनीकांत, चांदोबा
- नदी = सरिता, तटिनी, तारिणी
- मित्र = सखा, स्नेही, सोबती
शब्द एक अर्थ अनेक
उदा. पान = झाडाचे पान (पर्ण) व पुस्तकाचे पान (पृष्ठ)
- तीर = नदीचा किनारा, काठ किंवा बाण
- कर = हात किंवा सरकारला दिला जातो तो भत्ता
- मान = शरीराचा एक भाग किंवा सन्मान
- कोळी = मासे पकडणारा किंवा एक प्रकारचा कीटक
- गज = हत्ती किंवा लोखंडी सळई