१) तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर: विश्वविख्यात बंगाली महाकवी, नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रविंद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेली व श्यामला कुलकर्णी ह्यांनी अनुवादित केलेली जाता अस्ताला ह्या कवितेत सूर्याची उपमा देऊन अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची क्षमता असते, हे सांगितले आहे. सूर्य स्वत: अस्ताला गेल्यानंतर पृथ्वी अंधारात बुडून जाईल म्हणून सूर्य चिंतेत असतो. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणवतात. पृथ्वीला आधार देण्यासाठी सूर्य संपूर्ण सृष्टीला विनंती करतो. पृथ्वीला अंधारापासून कोणीतरी वाचवलं पाहिजे. मी अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते. कवितेतील या आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे, असे वाटते. एखादया पित्याला आपल्या मुलांच्या जीवनाबद्दल चिंता असते तसाच सूर्य देखील पृथ्वीची काळजी घेणारा तिला जपणारा पिता आहे असे प्रतीत होते.
२) पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तर: सूर्य स्वत: अस्ताला गेल्यानंतर पृथ्वी अंधारात बुडून जाईल म्हणून सूर्य चिंतेत असतो. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणवतात. पृथ्वीला आधार देण्यासाठी सूर्य संपूर्ण सृष्टीला विनंती करतो. मात्र कुणीही पुढे येत नाही. अशावेळी लहानशी पणती धैर्य दाखवत सूर्याला सामोरी जाते. सूर्याएवढा प्रकाश ती पृथ्वीला देऊ शकणार नाही, ह्याची तिला कल्पना आहे. पूर्ण अंधार जरी आपण दूर करू शकलो नाही तरी काही प्रमाणात आपण पृथ्वीला उजेड देऊ शकतो ह्याची पणतीला खात्री आहे. म्हणजेच आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण अवघड गोष्ट पण साध्य करू शकतो. प्रत्येक छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची क्षमता असते.
३) सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा.
उत्तर: सूर्य उगवल्यानंतर एक नवचैतन्य येते. सूर्याच्या प्रकाशात मानवी मन उजळून निघते. दिवसभर काम करण्याची ऊर्जा मानवाला मिळत असते. जसजसे सूर्यास्ताची वेळ जवळ येते तसतसे माणसाचे मन कृतार्थ भावनेने भरून येते. कधी कधी मानवाचे मन उदासही होते. परंतु; उद्या पुन्हा सूर्योदय होणार ह्या भावनेने मन पल्लवीत होते.
४) कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर: विश्वविख्यात बंगाली महाकवी, नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रविंद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेली व श्यामला कुलकर्णी ह्यांनी अनुवादित केलेली जाता अस्ताला ह्या कवितेत सूर्याची उपमा देऊन अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची क्षमता असते, हे सांगितले आहे. सूर्य स्वत: अस्ताला गेल्यानंतर पृथ्वी अंधारात बुडून जाईल म्हणून सूर्य चिंतेत असतो. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणवतात. पृथ्वीला आधार देण्यासाठी सूर्य संपूर्ण सृष्टीला विनंती करतो. मात्र कुणीही पुढे येत नाही. अशावेळी लहानशी पणती धैर्य दाखवत सूर्याला सामोरी जाते. सूर्याएवढा प्रकाश ती पृथ्वीला देऊ शकणार नाही, ह्याची तिला कल्पना आहे. पूर्ण अंधार जरी आपण दूर करू शकलो नाही तरी काही प्रमाणात आपण पृथ्वीला उजेड देऊ शकतो ह्याची पणतीला खात्री आहे.
ह्या संदर्भातून सूर्य म्हणजे एक हळवा जनक(पिता) आहे असे भासते. आपल्या घरासाठी, भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तीशाली व ताकदवान असलो तरी एका पित्याप्रमाणे विनम्रता धारण करावी लागते. तसेच संपूर्ण आत्मविश्वास असलेल्या पणती प्रमाणे आपली जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे जाणवते.