प्र. १. खालील शब्दसमूहांतील संकल्पना स्पष्ट करा.

  • श्रमशक्तीचे मंत्र – श्रमाचे महत्व
  • हस्त शुभंकर – राबणारे हात, कल्याणकारी हात
  • आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार – उत्क्रांतीचा (प्रगतीचा) जयघोष

प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.

  • उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक

उत्तर: हातांनी डोलणारे यंत्र, श्रमशक्तीचे मंत्र, उद्योगाचे चक्र

  • देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी

उत्तर: एकजूट, श्रमशक्ती, उद्योग, हस्त शुभंकर

प्र. ३. काव्यसौंदर्य.

  • खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार  II

उत्तर: ‘स्वप्न करू साकार’ या कवितेत प्रसिद्ध कवी ‘किशोर पाठक’ म्हणतात की या देशाची माती, संस्कृती तसेच देशाची परंपरा ही आपली म्हणजे भारतीयांची आहे. कवीने येथे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कवी या ओळींद्वारे आपल्या जन्मभूमीवर, कर्मभूमीवर असलेले प्रेम व अभिमान दाखवत आहेत. नव्या पिढीच्या नव्या भारताचे स्वप्न कवी येथे पाहत आहेत. 

  • खालील पंक्तींमधून सूचित होणार अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार II

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार II  

उत्तर: प्रसिद्ध कवी ‘किशोर पाठक’ यांनी लिहिलेल्या ‘स्वप्न करू साकार’ या कवितेत कवीने देशाचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील शेतकरी परिश्रम करुन धान्य पिकवतो. या धान्याला कवीने मोती म्हंटले आहे. असे धान्यरूपी धन शेतकरी आपल्यासाठी कमवत आहे. त्यामुळे आपला देश सुजलाम् सुफलाम् झाला आहे.  इथे उगवणारी फुले व जन्म घेणारी मुळे ह्यांच्या हसण्याने जणू श्रावण खुलतो. या देशात जन्म घेणारे बाळ हे तेजस्वी आहे. नवी पिढी आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून देशाचे भविष्य उज्ज्वल करेल, अशी कवीला आशा आहे.

  • या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: ‘स्वप्न करू साकार’ या कवितेत प्रसिद्ध कवी ‘किशोर पाठक’ म्हणतात की या देशाची माती, संस्कृती तसेच देशाची परंपरा ही आपली म्हणजे भारतीयांची आहे. कवीने येथे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. शेतात मोत्यासारखे धान्य पिकेल व शेतकरी राजा प्रसन्न होईल, असे कवी म्हणतात. तसेच लोकांना श्रमाचे महत्व समजेल व यंत्रांना चालना मिळेल, उद्योगधंद्याची वाढ होईल व देशाचा विकास होईल. येणारी नवी पिढी सुद्धा देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सतत प्रयत्न करेल.

  • कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.

उत्तर: कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे. ‘हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट’ या पंक्तीवरून कवी म्हणतात, देशाची जनता एकत्र आली तर मनगटात बळकटी येईल व प्रगती शक्य होईल. आम्ही देशवासीय करोडोंच्या संख्येने जरी असलो तरी आमच्या मनगटात एकीचे बळ आहे. आम्ही खूप श्रम करुन यंत्रांना चालना देऊ व उद्योगधंद्याची वाढ करू असे कवी सांगतात.